Friday, 19 August 2011

19 th August. MAER's MAE , SCOS, Ferguson !

1) MAER's MAE Alandi - Chaha ani Creamrole

    The performance was below average. 

    Overall Rating 2.0 - 3.0

----------------------------------------------------------------------------------

2) SCOS -  Madhyam

    Writer : Prathamesh Bhong
    Subject : Tensions between a man and a woman arising from doubt over infidelity.
    Characters : Anu and Abhi ( names may be wrong ), boss, friends etc.
    Story : It's a story about a couple. He works as an editor, she as a reporter. There are usual debates
                between them regarding whether being a reporter is more difficult or being an editor
                or columnist. One of their friend has lost her job because she denies to compromise ( her
               boss wants her to sleep with him and she denies. ) Meanwhile Abhi decides to write a
               particular week's editorial article on the topic - Media. While writing an article he starts
              doubting Anu's character. At end both come together to have a happy end !

    Script : Average
    Direction : Average. The photo frame of Anu comes closer when he feels the loneliness.
    Set : Decent.
    Lights : Good.
    Music : Good.
   
एकाच नाटकात अनेक विषय हाताळले होते. नाटकाची सुरुवात होते अभी आणि अनु यांच्या आयुष्यातल्या क्षणचित्रांपासून. उदाहरणार्थ अभीला नोकरी मिळणे , अनू वेगवेगळ्या बातम्या cover करण्यात busy असणे , दोघांची भेट होणे, ओळख वाढत जाणे, प्रेमात पडणे इत्यादी. या क्षणचित्रांचा शेवट होतो अभी अनूला propose करेपर्यंत आणि मग इथून पुढे एका party चा scene सुरु होतो. party च्या ह्या scene मध्ये media ह्या field मधला वाईट भाग समोर येतो. उदाहरणार्थ boss चे अंगाशी खेटणे, लोकांचे एकमेकांशी सलगी करणे इत्यादी. इथे अभी ची मैत्रीण ( समजा मधुरा ) party मध्ये येते जिथे ती तिचा problem अभी शी discuss करते. ह्या क्षणी नाटकाचा विषय 'media मध्ये होणारी sexual harrasement ' हा वाटायला लागतो. पुढच्या scene मध्ये अभी आणि अनू - पत्रकारिता आणि स्तंभलेखन यांची comparison करताना दिसतात - त्यामुळे विषय पुन्हा एकदा नवीन वळण घेतो. या संपूर्ण scene मध्ये अभी उगाचच एक मोठ्ठा thesis लिहितोय ह्या अविर्भावात सतत वावरत असल्याने त्या थेसिस बद्दल प्रेक्षकांच्या मनात इतका कुतूहल निर्माण होतं की पुढच्या प्रवेशात 'हा एवढा वेळ ज्या थेसिस बद्दल घालवतो आहे त्याबद्दल थोडा तरी प्रकाश पडेल असा वाटत रहात. ह्या संपूर्ण scene मध्ये अभी आणि अनू एकमेकांशी इतका गोडगोड , लटक्या रागात भांडत असतात की ह्यांना एवढी मोठी पदे नोकरीत मिळालीच कशी अशी शंका येऊ लागते. थोडक्यात - लेखक तर म्हणत असतो की - अभी मोठा स्तंभलेखक आहे आणि अनू chief reporter वगैरे आहे - पण दिसताना तर भलतेच दिसत राहते. यानंतर नाटक अजूनच भलतेच वळण घेते. अभी ला शंका येऊ लागते की अनू इतक्या मोठ्या पदावर गेलीये - कारण तिने आयुष्यात कधीतरी compromise केले आहे. ह्या वळणावर मात्र नाटकाची गाडी जेंव्हा वळते तेंव्हा तिचा तोल जाणार हे निश्चित वाटायला लागते आणि अपेक्षेप्रमाणे गाडी दरीत खोल कोसळते. सगळ्यात शेवटी अभी अनूला एक मोठ्ठी गोष्ट सांगत बसतो. ती ऐकताना अनू इतकी भावनाविवश का होते, अभी सुध्धा इतका का रडू लागतो याची उत्तरे मात्र उलगडत नाहीत - नक्की प्रोब्लेम काये बुवा यांचा - इतपत शंका येऊन नाटक संपते.

नाटकात अभिच्या मैत्रिणीने अनू चे काम केले असते तर चांगले झाले असते हा विचार येऊन गेला. कधी कधी supporting actor च बक्षीस मिळवून जातो ना - तसा फील येतो !

   
    Overall Rating : 5.5

----------------------------------------------------------------------------------

    3) Fergusson Mahavidyalay - Raavipaar

          Original Story : Raavipaar ( Gulzar Sahab )
          Direction : Bhairavi Deshmukh
          Script : Could have been very good.
          Story : Most of us know this story - as it is very famous one. In brief :
It's a story of a Sikh family. 2 of the family's members have been killed so far in partition riots. The
family is terrified by the incidents happening around them. During the turmoil, Shaheen gives birth to
twins. They decide to move to Amritsar. During the railway travel one of the child stops showing any
symptoms of life. The passanger asks the man to drop the child in the river. ( The reason is not heard
properly due to non-clarity  of dialogs ) The man by mistakes drops the child which is alive. They hear
the sound of cries when he drops the child.
       Acting : Decent.
       Direction : Above average. Decent.
       Music : Good
       Set : Well thought. The railway was really good. Even the Gurudwara was very decent.
       Lights : Good.
    
Fergusson college च्या रावीपार एकांकिकेकडून खूप अपेक्षा होत्या पण त्या पूर्ण नाही झाल्या. फाळणीत घराची झालेली वाताहत याबद्दल पात्रे फक्त बोलत होती. त्याची झळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नव्हती. घरातल्या आजीला अमृतसर ला पाठवणे - ह्या कथाभागाला विनाकारण खूपच जास्त महत्व दिले गेले. बर - बीजी जाते नं जाते तोच - ज्या गुरुद्वारात हे कुटुंब राहत असते त्याच्याही आजूबाजूला दगडफेक सुरु झाल्याने मग हेही राहिलेले लोक ठरवतात की आपणही अमृतसर ला जाऊयात. एकापाठोपाठ सगळेच जाणार होते तर मग आजीला आधी घालवण्यात दिग्दर्शकाने असं काय वेगळं साध्य केलं कुणास ठाऊक. रेल्वे सुरु होण्याचा scene मात्र छान झाला. ( लोकांनीही भरपूर टाळ्या वाजवून ह्या कुटुंबाच्या गमनाला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. :-) ) रेल्वे सुरु झाल्यावर lights सुद्धा छान जमून आले होते. एकंदरीत नाटकानेही रेल्वे बरोबरच आता वेग घेतला होता. पण वेग घेतला नं घेतला तोच नाटक संपले.

एकंदरीत बाहेरची निर्घृण परिस्थिती, लोकांचे जीव मुठीत घेऊन केले जाणारे पलायन, लहान बाळाचा थंड पडत जाणारा प्रतिसाद , त्यावर आईबापांची रेल्वे च्या वेगाबरोबर वाढत जाणारी घालमेल, क्षणात बाळाची किंचित चाहूल - त्यातून त्याच्या जीवाबद्दल आईबापाला वाटणारी शाश्वती - पुन्हा बाळाचे बंद झालेले प्रतिसाद , आधीच आजूबाजूच्या घटनांमुळे अस्थिर झालेले मन आणि शेवटी चुकून जिवंत बाळाला टाकणे - ह्या सर्व गोष्टींमध्ये खरे नाट्य होते. ह्यावर दिग्दर्शकाने अजून जास्त विचार केला असता तरी अधिक उत्तम प्रयोग पाहायला मिळाला असता.

कथेचे नाटकात रुपांतर करताना , कथासूत्र मांडण्यासाठी वेगळ्या वाटा शोधाव्या लागतात. या कथेचे नाटकात रुपांतर करताना - नाटकाची सुरुवात " आपल्याला अमृतसर ला जाणे भागच आहे " या घटनेपासून सुरु व्हायला हवी होती. आणि येथून सुरुवात करून ते जिवंत बाळाचा रडण्याचा आवाज येणे येथपर्यंत चा प्रवास खरा नाट्यपूर्ण असा आहे. त्यामुळे नाटकातील शेवटचा भाग सोडल्यास नाटकात बाकी काहीच उरले नाही. आणि मग खूप संयमित अभिनय असूनही नाटकाचा म्हणावा तितका प्रभाव पडत नाही. याशिवाय आई-वडिलांचे स्वतःच्या अगदी तान्ह्या बाळाला हाताळणे अत्यंत casual जाणवत होते.
      Overall Rating : 6.0

----------------------------------------------------------------------------------      

1 comment:

  1. रावीपार कडून खूप अपेक्षा होत्या... पण काहीच पूर्ण झाल्या नाहीत. सगळाच नाटक वरवरच वाटलं...

    ReplyDelete