1) Modern Ganeshkhind - Vaadhdivas
Subject - Kasab
Story : Kasab commits suicide.
Script : Average.
Direction - Average.
Lights - Average.
Set - Average.
Background Music - Average.
ह्या कोलेज कडून खूप अपेक्षा होत्या - अत्यंत शब्दबंबाळ आणि भाबडी संहिता होती ! :(
Overall Rating - 3.0 - 4.0
--------------------------------------------------------------------------------------------------------------
2) Kashibaii Navale Engg. College - Raajdand
Subject - Corrupt social system.
Story - There are 5 positions to be filled for the post - Communication Officer in Sachivalay - Mumbai. Three candidates - two boys and a girl - with high qualifications appear for the interview. All of them does a great job in interview and each one is confident to get this job. But all of these positions are filled by the referrals of politicians. These three candidates could see that there is hell lot of corruption in appointing the officers on these posts. They try to protest. They somehow manage to get the file containing the details about how they perform in an interview. They catch the officer named - Tamhankar - who did all this. Eventually they think of making a change in this so called system and they steal the national flag which is going to be used in flag hosting ceremony on 15th August. The play ends with Vinda Karandikar's poem in chorus - Mazya Mana Ban Dagad
Script - Good. The frustration of the three candidates was portrayed with correct dialogues.
Direction - ह्या नाटकाचे दिग्दर्शन संहितेला धरून होते. तीनही उमेदवारांचे समुद्राच्या किनारी ठेवलेल्या सिमेंट च्या ब्लॉक्स पाशी येऊन नैराश्य बाहेर काढणे - अप्रतिम संकल्पना होती. समुद्रकिनारी जसे हे ब्लॉक्स हजारांच्या संख्येने उन-वारा-पाऊस कोणत्याही तक्रारीशिवाय झेलतात - किंवा निर्जीवपणे अव्याहतपणे हा मारा सहन करत असतात - हे ह्यातून दाखवायचे होते. हे ब्लॉक्स म्हणजे कोणताही प्रतिकार न करणाऱ्या समाजातले असंख्य तुम्ही आम्ही सगळे - आणि ह्यांच्या पुढे हे तीन उमेदवार उभे ठाकले आहेत - ही प्रतिमाच अप्रतिम होती. उमेदवारांच्या निवडीची प्रोसेस सुद्धा चांगली रंगवली होती. मुलाखत घेणारे तीनही अधिकाऱ्यांचे काम अजून चांगले होऊ शकले असते ! त्यातही चष्म्याच्या आडून जो अधिकारी बघत होता - त्याचे तसे बघणे - आणि त्याचा तो लूक - यथायोग्यच होता. शेवटच्या १० मिनिटात - नाटक परिणामकारक करण्याच्या फंदात - भरकटत गेले असे वाटले. - माझ्या मना बन दगड - ही कविता नैराश्य अधोरेखित करताना योग्य वाटत होती - पण शेवटी - " ऐका टापा ऐका आवाज - लाल धूळ उडते आज " - हा रेफरन्स विंदांनी - communist विचारसरणी साठी वापरला आहे - तो नाटकाच्या शेवटी आल्याने - " पुन्हा कम्युनिस्ट यावेत आणि क्रांती घडवून आणावी " हा संदेश मुलांना द्यायचा आहे कि काय - असे वाटण्याची शक्यता आहे. त्या ओळींमधली - लाल धूळ - कम्युनिस्ट विषयक आहे - हे विचारात घेणे महत्वाचे आहे. नाटकाच्या शेवटी - नाटकाने आत्तापर्यंत राखलेला वास्तववादी फॉर्म सोडला - आणि उगाचच पथनाट्याच्या फॉर्म मध्ये घुसले. एकंदरीत खूप चांगले दिग्दर्शन होऊ शकले असते. नोकरी न मिळणे - म्हणजे अस्तित्व न उरणे - इतपत ज्या लोकांची अवस्था असते - त्यांची तडफड बाजूलाच राहिली - आणि उगाचच क्रांती वगैरे करण्याच्या नादात - नाटक भरकटले.
प्राथमिक फेरीच्या दृष्टीने नाटकाने जेवढे मार्क्स पडणे अपेक्षित आहे तेवढे नक्कीच पडले आहेत. पण फायनल च्या दृष्टीने नाटकाची वीण अजून जास्त घट्ट बसवणे गरजेचे वाटते. हे एक उत्तम नाटक आहे - आणि क्रमांकात येण्याच्या दृष्टीने असलेल्या सगळ्या गोष्टी ह्यात आहेत !

अभिनय - नाटकाची सुरुवातच त्या मुलीने अत्यंत नाटकी आवाजात आणि अभिनयात केली. कोणीही लक्षात राहील असा अभिनय केला नसला तरी सर्वांनी नाटकाला कुठेही बोअर सुद्धा होऊ दिले नाही हेही खरे. केबिन च्या बाहेर बसलेल्या - बायीने चांगला संयत अभिनय केला. एकंदरीत खूप सुधारणा गरजेची आहे.
नेपथ्य - सुरेख.
प्रकाशयोजना - उत्तम.
संगीत - ठीक.
Overall Rating - 6.5 - 7.0
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
3) Dnyanganga Engineering College - Vaari
अत्यंत फ्रेश आणि सुरेख नाटक !
संकल्पना - ह्या नाटकाला एक कथा अशी नव्हती. वारी - हा समान धागा होता. नाटकाची सुरुवात वारीने झाली. सुरुवातीतच नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली. सुरुवातीपासून एक वारीत सामील होणारा एक - म्हातारा वारकरी जो होता - तो फारच अप्रतिम काम करत होता - अत्यंत सुरेख. पण तो नंतर आलाच नाही. त्याचे बघणे- पाठीत वाकणे - हात थरथरणे फारच अप्रतिम होते. त्याची अभिनयाची समजही खूप आहे हे जाणवत होते.
वारी - ह्या एका शब्दाच्या वेगवेगळ्या पैलूंना स्पर्श करत नाटक पुढे सरकत होते. मग खरी-खुरी वारी, शिक्षणातली मुलांची वारी, नेत्यांच्या भाषणांना गर्दी करणाऱ्या लोकांची वारी असे अनेक प्रसंग येऊन गेले. नाटकाच्या मध्यात - नाटकाच्या मुख्य कथेस सुरुवात झाली. प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेस कंटाळलेला एक मुलगा अभियांत्रिकीला प्रवेश मिळवतो. आणि मग - कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाशी संबंध नसलेल्या अश्या एका शिक्षण व्यवस्थेशी त्याचा सामना होतो. एकीकडे हा मुलगा आणि दुसरीकडे शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने निराश झालेला एक शिक्षक अश्या दोन मार्गांवर मग नाटकाचा प्रवास सुरु होतो. शिकवण्याच्या पवित्र अश्या कार्यात - ह्या शिक्षकाची खूपच घालमेल होत असते - कारण त्याच्या कडे काहीतरी शिकायचंय म्हणून येणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा - मार्क्स पाडण्यासाठी व घोकंपट्टी करण्यासाठी नोट्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचीच रीघ त्याच्याकडे लागते. शिक्षकी पेशात आपला विठ्ठल शोधणाऱ्या ह्या शिक्षकास आता त्याचा विठ्ठल गवसेनासाच होतो. शेवटी ह्या विद्यार्थ्याची आणि ह्या शिक्षकाची भेट होते - आणि जणू अगदी प्रामाणिक भक्ताला विठू मिळावा आणि विठूलाही अगदी प्रामाणिक भक्त मिळावा - अशीच दोघांची अवस्था होते. शिक्षकास पुन्हा एकदा शिकवण्यामध्ये - विठू दिसायला लागतो. :-)
दिग्दर्शन - सुंदर. वारीचे प्रसंग - त्यातले उपरोधिक टोमणे - शिक्षकाची कुचंबणा - घालमेल - विद्यार्थांची होणारी कुचंबणा - अप्रतिम रंगवली होती. शेवटी शब्दशः होणारे विठूचे दर्शन - कळस होता. :-) विषय मांडण्याची कुठेही घाई नाही - कोणताही अभिनिवेश नाही ! नाटकाचा ठेहेराव नाटकाला वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला.
अभिनय - चांगला. वारीतला म्हातारा - आणि कीर्तनकार - उल्लेखनीय ! कीर्तनकाराच्या आवाजाने रसिकांच्या मनांना जिंकले. पण त्याने शेवटी जे जोग रागातले भजन गायले - ते त्याने शास्त्रीय गायक जसा गाईल त्या बेअरिंग मध्ये गायले - तेच जर त्याने शिक्षकाच्या बेअरिंग मध्ये गायले असते - तर मन अधिक भरून आले असते. इतर कलाकारांच्या अभिनयात सुधारणा करण्याची खूप जास्त गरज आहे. किंबहुना - कीर्तनकार आणि शिक्षकानेही वेगवेगळ्या भूमिका वठवताना - वेगवेगळ्या प्रकारचे बोलणे अपेक्षित आहे - तो शिक्षकाचेही काम करताना कीर्तन्कारासाराखाच बोलत होता. एकंदरीत अभिनय अजून खूपच जास्त चांगला होऊ शकतो.
पार्श्वसंगीत - अभंगांचा - भजनांचा वापर सुंदर. एकंदरीत छान !
प्रकाशयोजना - उत्तम.
नेपथ्य - पूरक आणि पुरेसे.
अभिनंदन ! :-)
Overall Rating - 7.5
Hi Girish!
ReplyDeleteDue to some work and other issues, I'm not able to watch this year's Purushottam.
reading your blog has definitely given me some picture about how this year's Purushottam is shaping.
thanks for all reviews and thanks to those who are commenting.
I have seen "rangit talim" of one play happening in next two days (not sure about the 'lot' or day of performance.)
I am looking forward to read about it from you.
Thanks again and keep writing!
All the best! :D
Aneesh Prabhune.
असेच होते करायचे तर, उगाच पडदा पाडलात का?
ReplyDeleteकरून नाटक छानच सुंदर, असे अचानक गेलात का?
मी काल एकच नाटक पाहिले आणि खूप आनंद झालं.. वारी नाटकाने पुरुषोत्तम मधली "चुरस" आता खूप वाढेल... कारण खरोखरीच तो एक अत्यंत परिणामकारक प्रयोग होता. नाटकाची संकल्पना आणि त्याची मांडणी ह्या दोन्ही चा मेळ इतका सुरेख होता की दिग्दर्शकाने वारी मधून खऱ्याखुऱ्या आयुष्यात आम्हाला कधी नेले आणि परत वारी मध्ये विठुरायाच्या दर्शनाला आणून कधी सोडले हे कळलेच नाही...
सुंदर !!
सर्वात महत्वाची आणि आवडलेली गोष्ट म्हणजे पूर्ण नाटकामध्ये कुठेही कोणतीही "रुपकं" ओढून ताणून आणली नव्हती किंवा विनोद हवाच म्हणून विनोद नव्हता किंवा आता "शेवटचा दणका" (पुरुषोत्तम च्या नाटकांची खासियत :P ) म्हणून कुठलाही "गनिमीकावा" सुद्धा नव्हता... होतं ते फक्त एक नाटक !!
असं म्हणतात की नाटकामध्ये "नाट्य" पाहिजे तरच ते स्पर्धेमध्ये "घुसतं". पण वारी ने त्यांना मांडायचा असणारा विषय इतका शांतपणे आणि विचारपूर्वक मांडला होतं की आल्हाददायक वातावरणात त्यांनी त्यांना जे सांगायचा होतं ते खूप वेगळ्या पद्धतीनी सांगितला आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं...
पण तरीही... नाटक अजून जास्त "जमून" आलं, तर खूपच वेगळ्या उंचीवर जाईल यात काहीच शंका नाही. सुरुवातीला वारीमध्ये खूप लोक असतात आणि नंतर नंतर ती लोक कमी होतात (हे असं करायचा होतं की झालं मला माहिती नाही) पण त्याचा मी घेतलेला अर्थ असा की - "खरच विठ्ठलाचा दर्शन" घ्यायला खूपच कमी लोक असतात त्याच प्रमाणे विद्यार्थी सुद्धा एकतर सवयीनी किंवा कोणीतरी सांगितला म्हणून काहीतरी करत राहतात. आणि खरेखुरे "विद्यार्थी" खूपच कमी असतात की ज्यांना काहीतरी "शिकायचं" असतं आणि ज्यांना "प्रश्न" पडतात आणि जे त्याची उत्तरं नाही मिळाली की बेचैन होतात. म्हणून एकूण लोकांची संख्या कमी होते नंतर (शेवटचा सीन) हे आवडलं.
अभिनयात सुधारणेला प्रचंड वाव आहे. प्रामुख्याने ज्या मुली काम करतायेत त्यांच्यात जर सुधारणा झाली तर नाटकाच्या एकूण प्रभावात आमुलाग्र बदल होईल यात काहीच शंका नाही.
संगीत सुद्धा चांगलं आहे पण अजूनही थोडा विचार केलं तर नक्कीच अजून चांगलं होऊ शकता... नाटकाची सांगीतिक पदे ज्यांनी गायली होती त्यानेच शिक्षकाचा, कीर्तनकाराचा अभिनय केला. ह्या सर्वामुळे संगीत आणि समोरची गायकी यामध्ये एकसंधता आढळली.
नाटकाची दिवेलागणी (लाईट :P) अतिशय साधी सरळ आणि सोप्पी होती आणि ती तशीच असावी असं वाटतं (मला तरी).
एकूण काय तर नाटक चांगलं झालं. नवीन मुलं आहेत अनुभवाने कमी आहेत पण जिद्दी आहेत हे दिसून आलं. एक चांगला अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद !!
Chan upkram aahe Girish, tumhi hya blogvarun mazyasarkyanna punha Ekankika anubhavnyachi sandhi dilit tyabaddal Thanks, I am missing those nowadays...
ReplyDelete