Friday, 26 August 2011

25 August - BMCC, SIT , Cummins Engineering College

 आजच्या तीनही नाटकांनी अपेक्षा या न त्या प्रकारे पूर्ण केल्या असे म्हणता येईल. पुरुषोत्तम २०११ चा सर्वात यशस्वी लॉट होता असे म्हणल्यास वावगे ठरू नये.

1) BMCC  -  Patient 

STORY वसू ( नाव चुकीचे असू शकेल ) लिव्हर क्यान्सर चा रुग्ण असतो. वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी त्याच्या नशिबात ह्या असाध्य रोगाशी झगडणे लिहिलेले असते. सुमारे २-३ वर्षे ह्या रोगाशी सामना करून अखेरीस तो ह्या वेदनेतून सुटतो - इतकी साधी सोपी सरळ गोष्ट होती. 


दिग्दर्शन - गेले काही दिवस मी जे - कथेचे नाटकात रुपांतर करताना - वेगळ्या वाटांचा शोध घ्यावा लागतो - असे म्हणतोय ते आजच्या नाटकात बघावयास मिळाले. वसू चे क्यान्सर ने आतून पोखरले जाणे - त्याचे वेदनेने तडफडणे - ह्यांची अभिव्यक्ती करण्यासाठी - ड्रिलिंग मशीन चा केलेला वापर - धातूच्या हातोडीने पडणारे घण - ह्यांचा उत्तम वापर करण्यात आला. करवतीचे - घणांचे आवाज , ड्रिलिंग मशीन चा आवाज ह्यांचा सुरेख वापर केला गेला होता. शेवटी त्याच्या डोक्यात होणारा असंख्य विचारांचा - भावनांचा गुंता दर्शवण्यासाठी - मागच्या बाजूस केलेला गुंता - अर्थ पोचवण्यास समर्थ होता. भूतकाळातल्या गोष्टींचा उल्लेख करताना - गादीखालील वापरलेला लाईट उत्तमपणे पोचला. वसूची बेड वरची वेदना व्यक्त करण्यासाठी - बेड उभा करणे - हा प्रयोग बीएमसीसी ने - who let the dogs out - ह्या एकांकिकेत आधीही केला असल्याने - पुनर्प्रत्ययाचा आनंद झाला.  एकंदरीत दिग्दर्शन पूरक होते. 

अभिनय - वसूच्या मध्यवर्ती भूमिकेतील कलाकाराचा अभिनय संयत होता - परंतु मुळातच निवेदनात्मक शैलीचा वापर केल्याने त्याचा अभिनय - वर्णनात्मक इतकाच उरला. बाकीच्यांचा अभिनय पूरक होता. विशेषतः - आई च्या वेशभूशेकडे दिलेले बारीक लक्ष - तिचे पडलेले शुष्क ओठ - चष्मा - ह्या गोष्टींमुळे ते पात्र इतरांपेक्षा उठून दिसले. भावाने केलेला अभिनय सुद्धा वाखाणण्याजोगा असाच होता. एकंदरीत अभिनयाच्या बाबतीत समाधानकारक कामगिरी जाणवली - अर्थात बीएमसीसी कडून तीच अपेक्षा होती - आहे आणि असेल. अभिनंदन ! 

नेपथ्य - उत्तम ! नेटके ! बेड ला गाठ मारलेली एक नाडी - दवाखान्यातला कपाटा वरची गणपतीची मूर्ती - जुना ट्रान्सीस्टर - यांचे प्रयोजन कळत होते. 

प्रकाशयोजना - अप्रतिम ! प्रकाशयोजने मध्ये दिग्दर्शन जाणवत होते. 

पार्श्वसंगीत - सुंदर. ठिबकणाऱ्या पाण्याचा आवाज, कर्वतींचे व ड्रिलिंग मशीन चे आवाज - उत्तम ! पण कुमारांचे - उड जायेगा - हे गाणे वापरणे मात्र - योग्य असले तरी अत्यंत प्रेडीक्टेबल होते. :-) 

नाटक - 'एका पेशंट चे आत्मवृत्त ' ह्या विचारापाशीच राहिले - आणि इथेच नेमके ते कमी पडले. आपल्या मृत्युनंतर आई-बाबांचे काय होईल , शेजारच्या बेड वर आलेली श्रीमंत घरातली मुलगी व तिच्या रोगाचे झालेले अवडंबर , दिवाळी मध्ये वसूच्या खोलीत गेलेले दिवे - ह्या तपशिलांमध्ये नाटक एकाच ठिकाणी विनाकारण स्थिर राहिले ! मग शेवटी काय उरले - तर बुवा कर्करोग झालेला एक रुग्ण अनेक वेदना सहन करून दगावला - एवढेच. नाटकात अजून वेगळे काय करता येईल - त्या वेगळ्या मार्गांमध्ये नाटक अडकून राहिले - त्यामुळे दिग्दर्शन करताना शोधलेल्या नवीन वाटांवर प्रकाश पडला - पण मुळातील पात्राच्या वेदनांपासून मात्र प्रेक्षक चार हात दूरच राहिला ! 

Overall Rating : 7.5 - 8 

----------------------------------------------------------------------------------

2) SIT - Hey there Delyahlah 

विषय - गर्ल फ्रेंड आणि बॉय फ्रेंड मध्ये 'घडणारे' - 'घडवून आणलेले' हास्य विनोद - रुसवे फुगवे - भांडणे - मतभेद - इत्यादी इत्यादी इत्यादी ...... 

कथा - शाळेची सहल गेलेली असताना मुलगा मुलीच्या प्रेमात पडतो. त्यांचे प्रेम डिग्री मिळेपर्यंत टिकते. मुलगी जीआरई देऊन परदेशात जाताना दोघांची भांडणे होतात. मग एक इमोशनल सीन घडतो - ज्यात मुलाला खूप वाईट वाटते. आख्खे नाटक घडताना मध्ये मध्ये कायम - मै हुं ना - सिनेमा मध्ये जसे शाहरुख च्या मागे व्हाओलीन वाजवणारे लोक असतात तसे असतात. आपण नाटक पुढे नेतोय असे वाटणारा - एक सो कोल्ड - लेखक तिथे नाटकात हॉटेल चे काम करीत असतो. प्रेक्षकांमध्ये छान हशा पिकवून नाटक समाप्त होते. :-) 

दिग्दर्शन - २००६ सालच्या ह्याच कॉलेज च्या - फिरोदिया स्पर्धेतील - Back to School - ह्या एकांकीकेशी मिळते जुळते असे दिग्दर्शन होते. मधेच मोबाईल मुळे अगदी हृदयातले बोलायचे कसे राहून गेले वगैरे यावर संवादातून भाष्य वगैरे येऊन गेले. 

लेखन - विनोदी :-) 

पार्श्वसंगीत - उत्तम ! पण पार्श्वसंगीत्कार स्टेज वर खूप वेळा येत होते ! 

सेट - पूरक. चांगला ! 
प्रकाशयोजना - उत्तम ! 

अभिनय - स्नेहाने काम छान केले. इतरांचीही कामे एकुणात छान. मुलाने काम थोडे लाउड केले असे माझे वैयक्तिक मत आहे - यावर मतभेद असू शकतात. 

पर्फोर्मंस चांगला झाला हीच ती काय जमेची बाजू ! १ + १ = २ हे आधीच माहित असल्याने नाटकातून फार काही मिळाले असे जाणवले नाही ! 

Overall Rating - 6.5 - 7 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


3) Cummins College of Engineering - Anvay ! 



ओ हेन्री च्या  The last Leaf - चे नाट्यरूपांतर होते ! 

कथा - मधु आणि मालती ( नावांबाबत माफ करा ) दोघी मैत्रिणी असतात. एकीला चित्रकलेचा छंद असतो आणि दुसरीला लेखनाचा. दोघीही गुरूंच्या शोधात असतात. मधु तिच्या शेजारच्या साधारण ५० वर्षे वयाच्या चित्रकार बायीच्या कलेने खूप जास्त प्रभावित झालेली असते व तिच्या कडे शिक्षण घेण्यास जाते. मालती - गोखले नावाच्या एका लेखकाच्या लेखनाने खूप जास्त प्रभावित झालेली असते - व ती त्यांना गुरु मानत असते. मधु चिकाटीने चित्रकलेचे शिक्षण - त्या पन्नाशीच्या बायीच्या लहरी स्वभावावर मात करून घेत असते - पण मालती मात्र गोखल्यांच्या - तिच्या लेखनावरच्या शेऱ्याने मनातून पार उध्वस्त होते. मालतीच्या घराच्या खिडकीतून - समोर एक वेल तिला दिसत असते. ती मनाशी अशी समजूत करून घेते की ह्या वेलाची सगळी पाने झडून जाईपर्यंतच तिचे आयुष्य शिल्लक राहिले आहे. दरम्यान एके दिवशी चित्रकलेचे शिक्षण घेताना - मधु तिच्या बायींवर खूप चिडते आणि त्यांना त्यांच्या खचून जाण्याची वगैरे जाणीव करून देते. शेवटचे पान शिल्लक असताना मग ह्याच बाई स्वतः हाताने रंगवलेले पानासारखे हुबेहूब दिसणारे चित्र काढून त्या वेलीवर लावतात. मालती मनात विचार करते - जर हे पान ह्या थंडीवाऱ्यापुढे  खंबीरपणे तग धरू शकते तर आपण का नाही ! तिचे मन जगण्यासाठी उभारी घेते - पण स्वतःच्या आयुष्यातली सर्वोत्कृष्ट कलाकृती निर्माण करून मात्र - चित्रकलेच्या शिक्षिका - हे जग सोडून गेलेल्या असतात. 

लेखन - चांगले. नाट्यरूपांतर चांगले केले आहे. 

दिग्दर्शन - चांगले. मालतीचे खचून गेल्यावर - खुंटीला टांगलेली रिकामी शबनम , विझलेला कंदील , जुना धातूचा पंखा , तुळशी वृन्दावानाच्या कोनाड्यात ठेवलेला विझलेला दिवा - छान ! आत्या आज्जीचे मालतीच्या घरात येऊन - गीतेतला पंधरावा अध्याय म्हणणे - व धुपाचा धूर तिच्याजवळ नेणे - त्यावेळी मधूचे आत्त्या आज्जीला अडवणे - अप्रतिम व सूचक. हा क्षण फारच सुरेख होता. चित्रकार बायींचे - चित्र काढण्यापेक्षा त्यातल्या कथेचा मागोवा घ्या असे सांगणे आणि - संगीत - वास - अनुभूती ह्या सगळ्याच माध्यमातून चित्रकला शिकवणे - नाटकाच्या निर्मिती मध्ये विचार केल्याचे द्योतक आहे. सर्वच मुलींची वेशभूषा , भिंतींचा रंग - सुद्धा छान विचार करून केला असल्याचे जाणवत होते. 

प्रकाशयोजना - उत्तम. 

नेपथ्य - सुरेख. नेपथ्य मांडणी , रचना , वापर आणि हालचाल - उत्तम. 

अभिनय - सुरुवातीच्या दोन भवान्या आज्ज्या सोडल्यास सगळ्याच मुलींचा अभिनय चांगला झाला. फक्त मधु जशी प्रौढ वाटत होती तशी मालती सुरुवातीला अत्यंत बालिश वाटत होती - त्यामुळे जेंव्हा गोखल्यांच्या शेर्यामुळे ती हाय खाते - तेंव्हा प्रेक्षकांना ती आधीपासूनच बालिश वाटत असल्या कारणाने  नंतरच्या तिचे खचून जाणे देखील सुरुवातीला बालिश वाटण्याची शक्यता आहे. पण मालतीने नंतर उत्तम काम केले.  चित्रकार शिक्षिका बायींनी चांगले काम केले. मधून मधून डोकावून जाणारी आत्या आज्जी - ठीक ठीक ! सर्वच मुलींचे आवाज मात्र खणखणीत होते. अभिनंदन ! 

नाटकातली पात्रे जशी वागताहेत, तशी ती का वागताहेत - ह्यातल्या बारीक तपशिलांकडे लक्ष दिल्यास नाटक उघडे पडेल की काय अशी भीती मात्र वाटते. मुळातली कथा रूपक कथा आहे. रूपक कथेचे वास्तव कथे मध्ये रुपांतर करताना - त्यातले रूपक - वास्तवातल्या पात्रांच्या वर हावी झाल्यास - ती पात्रे वास्तवापासून भिन्न असे वर्तन करू लागतात. त्यामुळे रूपक आणि वास्तव यांचा एक प्रकारचा balance साधावा लागतो. ह्याच ब्यालंस ला ह्या नाटकात मधून मधून धक्का लागत होता ह्याची प्रचीती आली.  त्यामुळे नाटक पात्रांच्या मनोव्यापारांपर्यंत नं जाता - त्यातल्या शेवटच्या परिणामा च्या दिशेने फक्त वाटचाल करते ! 

Overall Rating : 7

----------------------------------------------------------------------------------

11 comments:

  1. BMCC chya lead cha awaj madhe madhe kami yet hota. pan tari hi BMCC cha overall performance kharach bhari hota. Ek gosht sangaychi ahe ti ashi ki aajcha show SCOE cha hota SIT cha navata. SIT ani SCOE hi 2 vegvegli colleges ahet. SCOE Khup chan show. Cummins Wasn't up to the mark. Acting var thod kaam hon apekshit hot

    ReplyDelete
  2. BMCC madhye abhinay kon karat hota sangu shakal kay ?? Ani Cummins cha review please post karava kunitari

    ReplyDelete
  3. SCOE ch jast chan vatle......bakichya college ne kay kele te kalat nhavte......BM ani cummins....baapre.....kay chalele tyanche....pan tumhi dardi ahat tyat....tumhala avadle asel.....pan lay man mhnaun mala SCOE ch jast avadle......khup chan kame keli saglyani.....plzzz bakkicha colleges na sanga amahal kalel ase kahi tari kara.....mi jar judge asto tar SCOE la full marks dile aste..... aaj khup sare break-up hya karna sathi hot ahet....relations mhnaje kay hech kalat nahi lokanna.....jara ajubajula baghitle tar disel....kitek jan US la jatana break-up karun jatat......SCOE ch natak jast bhidle....

    ReplyDelete
  4. aaj chi natke kharch khup chan zali......puru suru zale ase vatle ....sahi yaaaarrrrrr.....aaj barrrreee vatle 3 nataka pahun.....tumhi judge ahat ka?

    ReplyDelete
  5. please... it was SCOE... not SIT.. SIT is different college under Sinhgad education .. SCOE is Sinhagad College of Engineering.. who won Firodia for Back to School

    ReplyDelete
  6. @ 3rd Anonymous - Mhanunach tu parikshay nahiyes ! :-)

    ReplyDelete
  7. @ - mala mahit nahi judges kaun ahet .......hyanche parikshan mi roj vachato....mhanun mala ase vatle ki he judge ahet.....so khup sadhe panane vicharlay...."tumhi judge ahat ka?"....

    ReplyDelete
  8. @Anonymous : Are anonymous navane kasala lihitos..... ha open forum ahe... ithe direct mat mandla tari chalta!!!! :-)
    Kalchya lot kadun kharach khup apeksha hotya n tya purn pan zalya..... BMCC ca performace changla zala.... Music chan hota...pan mala thodasa monotonus watla.... tyancha Bed chya khalchya light cha effect thodasa gandla asa mala tari watla..... natak madech pale padle... tya mulichya scene ugach madhye ghusadala asa watla.... pan ekandarit Chan!
    SCOE chya performance baddal me 1st anonymus she shahamat ahe..... Prayog manun tyane chan kela... Lead actor (Niranjan i think) ch kaam thoda loud zala pan tyanche flexibility must hote... Comedy aslyane prekshancha responce pan zakkas hota!!! All n All... Chan hota!!!
    Cummins ch natak che storych khup must hote...pan madech tyanche bearing sutlya sarkhe zale.... manje he maje personal openion ahe... chuk pan asel kadachit!Made made cummins kadun taltya yenya sarkhya chuka zalya... (Black out chya adhich stage war yene te pan 2 wela... etc)
    Spl mention for lights in SCOE as well as in Cummins!!!!

    All in All... Very good lot and 9wat janyasathiche contender!!!!

    ReplyDelete
  9. ALL The performances are nice aani Mr/Ms Anonymous je ki mhantayet BMCC aani Cummins ni kay kela te samajala nahi.......tar me sangu ichhito ki te samjanyasathi natak kay he samajna jast garajecha aahe.......aani next time navane comment kara as it is an open forum....ok

    ReplyDelete
  10. i think all 3 colleges were 'best'. Pan tya paiki BM cha 'the best' jhala. tyancha vishay thoda vegla hota ani tyanni to agdi chaan mandla. ani tyat lead actor (i think siddhesh) ne changle kam kele. avaj thooda kami janvat hota....but overall the best....
    ani ratings madhye mala kahi adchan nahi. BMCC Deserves that..even for SCOE n Cummins...

    ReplyDelete
  11. i think bmcc and cummins have given their best....scoe was also gud...but the story was repititive and other two have putforth some other views...which needs to be considered!!

    ReplyDelete