Sunday, 28 August 2011

28 August - Morning Session - Appasaheb Jedhe , Indira College of Commerce & Garware College

1) Appasaheb Jedhe Mahavidyalay - Mohor 

कथा - आंब्यांचे पीक घेणाऱ्या एका बागायतदार शेतकऱ्याची ही कथा ! एके वर्षी त्याच्या आंब्यांच्या झाडांना भरपूर मोहोर येतो. घरातला प्रत्येक जण - आता घरात सुखसमृद्धी नांदणार म्हणून स्वप्ने रंगवत असतो. गावातल्या व्यापाराशी झाडांच्या विक्रीबाबत बोलीही ठरते. पण मुसळधार पावसात सगळा मोहोर नष्ट होतो. शेतकरी स्वतःच्या नशिबावर खूप रागावून झाडे तोडायला निघतो. पण त्याचा लहान मुलगा त्याला सावरतो. शेवटी - तो मुलगा बापाची स्वप्ने उराशी बाळगतो आणि दुसऱ्या वर्षीच्या फुललेल्या मोहोरात - आणि पर्यायाने येणाऱ्या सुखसमृद्धी मध्ये हरवून जातो. 

लेखन - साधे -सरळ लेखन होते. कुठेही साहित्यिक बडेजाव नव्हता. पण सुरुवातीला खूपच भोळसट पात्रे रंगवली आहेत - अश्या प्रकारचे लेखन होते. 

दिग्दर्शन - खूपच जास्त वेळा black outs होते. स्वप्नंरंजनाचे प्रसंग चांगले रंगवले होते. शेतकऱ्याचे मनातून उध्वस्त होणे - अभिनयातून अधिक परिणामकारकपणे दाखवता येऊ शकले असते. त्या प्रसंगात एकंदरीतच खूप आरडा ओरड झाली. पालखी येण्याच्या प्रसंगाची फारशी गरज वाटली नाही. शेतकरी अत्यंत सद्वर्तनी आणि प्रसन्न रंगवण्याच्या नादात - सुरुवातीचे प्रसंग फारच लाडिक लाडिक झाले असे वाटले. त्याचे पात्र रंगवणारा सारखाच प्रसन्न हसण्याचा प्रयत्न करीत होता. एकंदरीत सर्व दिग्दर्शन फक्त वर-वरच्याच पातळीवर राहिले असे वाटले. 

अभिनय - ठीक. 

नेपथ्य - मोजके . आंब्याची झाडे स्टेज वर न आणण्याचा निर्णय चांगला होता. :) 

प्रकाशयोजना - चांगली. झाडांसाठी वापरलेला हिरवा लाईट अजून जास्त शार्प करता आला असता. एकंदरीत चांगली. 

पार्श्वसंगीत - काही वेळा खूप जास्त लाउड वाटले. पण एकंदरीत समाधानकारक. 

नाटकाचा शेवट - नाटकास 'मोहोर' हे नाव का दिले याचे विश्लेषण करण्यात झाला - ते थोडे खटकले. एखाद्या सिरीयल चा एपिसोड संपावा तसे नाटक संपले. 

Overall Rating - 6.0

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

2) Indira College of Commerce - Laadasta 


विषय - नक्षलवादी चळवळ - तरुण त्यात कसे ओढले जातात - त्यात ओढल्या गेलेल्यांची सरकार आणि स्वतः त्यांच्यामुळेच कशी दुतर्फा गळचेपी होते इत्यादी ! 

कथा - ( पात्रांची नावे चुकल्यास कृपया माफ करा ) म्हादू आपल्या हलाखीच्या आयुष्याला - व त्यात गुदरलेल्या अन्यायाच्या प्रसंगांना कंटाळून नक्षलवादी लोकांना सामील होतो. तिथे एक दिवस त्यांनी गावातल्या शिक्षिकेस पळवून आणलेले असते. म्हादू शिकलेला असतो. त्या दोघांचे स्वभाव आणि मते जुळतात. एके दिवशी पोलीस स्टेशन वर केलेल्या हल्ल्यामध्ये - म्हादू नक्षलवादी लोकांना सामील झाल्याचे पोलिसांना कळते. शेवटी म्हादू आणि शिक्षिकेच्या मदतीने पोलीस 'लालदस्ता' संघटनेचा खात्मा करतात. :-) नाटकाचा शेवट म्हादू आणि शिक्षिका यांना अपत्य होऊन होतो. 

लेखन - जे हजार वेळा आपण ऐकत आलोय नक्षलवादी संघटनेबाबत तेच मांडले होते. पात्रांची खडाजंगी वगैरे रंगवण्यात लेखक काही प्रमाणात यशस्वी झाला असला - तरी नाटक तेवढ्यापुरतेच राहिले. 

दिग्दर्शन - लेखन व दिग्दर्शन जशास तसे होते. 

अभिनय - मुलीने चांगला अभिनय केला. ( शिक्षिकेने ) म्हादू कधी कधी अभिनय करतोय असे जाणवत होते. नक्षलवाद्यांच्या म्होरक्याने चांगला अभिनय केला. एकंदरीत सर्वांचा अभिनय चांगला होता. 

नेपथ्य - ठीक-ठाक 

प्रकाशयोजना - ठीक. 

पार्श्वसंगीत - ठीक.

Overall Rating - 6 - 6.5 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

3) Garware College - Aati Rahengi Baharen ! 

कथा - साधी सोपी भोळी भाबडी कित्ती कित्ती गोड ! नववीच्या वर्गातल्या नवीन वर्गशिक्षिका दिसायला - वागायला - बोलायला खूपच गोड असतात बुवा ! इतिहासाचे शिक्षक तर खूप्पच छान असतात दिसायला - सगळी मुले बायींवर आणि सगळ्या मुली सरांवर मारत असतात. पण आपल्या वयाचा विचार करता - आपले काही त्यांच्याशी सुत जुळणे शक्य नाही - हे बालकांच्या लक्षात येते. मग ते सरांचं आणि बयींच सेटिंग करायचा जबरदस्त प्लान करतात. वर्गात दुसऱ्या एक शिक्षिका असतात - ज्या ह्या मराठीच्या बायींवर खूप जळत असतात. त्या मुलांना सारख्या सारख्या मारत असतात. मुलांना त्यामुळे त्या मुली अज्जिबात आवडतच नसतात. आणि एक गम्मत सांगू का - मुले कष्टाने हे जे जुळवून आणत असतात ना त्याचा मुली काही उपयोगच नसतो - हे हे हे हे - कारण सरांचं आणि बयींच तर आधीपासूनच प्रेम असतं ना ! पण अत्यंत निरागस ( ??? ) मुलांना मात्र हे माहीतच नसतं. सो स्याड ना :( :( :( आणि हौऊ स्वीट पण ! :):):) शेवटी शाळेचे अधिकारी या प्रेमीयुगुल सर आणि बायींना बडतर्फ करतात ! तेवढ्यात तिकडून दुसऱ्या शिक्षिका येताना मुलांना दिसतात आणि - त्यांच्यावर मुले एकदम लट्टू होतात ! कित्ती कित्ती कित्ती गोड ना ! 

लेखन - खूप खूप खूप स्वीट ! :) 

दिग्दर्शन - एकंदरीत लेखन खूप खूप खूप स्वीट असल्याने दिग्दर्शन म्हणजे तर काय - जम्माडी - जम्माडच ! :) 

नेपथ्य - वर्ग - टेकडीवरचा बाक ! 

प्रकाशयोजना - चांगली. 

पार्श्वसंगीत - ते तर आमचा गुपितच आहे बाबा ! छान ! 

Overall Rating - 5.5 - 6.0 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

11 comments:

  1. shevatach natak mhanaje talyatala varg navachya natakachi punaravrutti hot. suruvatila changal vatnar he natak nantar thod rataal zal. ani background music kharach "awara" hot

    ReplyDelete
  2. ekunat ya blog ani blog writer baddal thodi samiksha.

    lekhan - yala lihita nakki yete.

    samaj - doubtful.

    reasoning - phaarach waeet.

    Bhasha - ati uddhat.

    review lihina hi pan ek kala ani titkich mahatwachi jababdari he kalana garajecha.

    Reader's rating for the Bolg - 3.5/10

    ReplyDelete
  3. हा वरचा निनावी माणूस नक्कीच गरवारेचा असावा.. हाहाहा: !!

    ReplyDelete
  4. daat shakyata naakaartaa yet nahi....

    ReplyDelete
  5. garwarechach aahe

    ReplyDelete
  6. म्हादू नाही ...चंदू

    ReplyDelete
  7. jya anonymous ni he lihila ahe ATI UDDHAT ani all..
    tyani blog lihavet mag ata sagalaya natakansathi...

    1st thing is ethe konalahi vicharale nahiye ki blog cha rating and all.. pratyek manus ha swatachya vicharancha adhar gheun lihit asato.. jar konala ha adhar patat nasel tar to suddha jyacha tyacha prashna ahe..
    so please.. do not put such comments..

    ani evadhach jar ahe na tula bolayacha tar mag naav sangun ani ACCOUNT varun comment kar na anonymous mhanun kashala..

    thanks !!

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. I completely agree with Amit....
    Anonymous....FYI....
    first sentense written by Girish about this blog...
    Headerch ahe bag ya bolg cha... kadipan Open kelas tari disel.....
    "प्रत्येक नाटकाचे माझ्या सद्सत-विवेकबुद्धीला अनुसरून केलेले हे रसग्रहण !"

    ReplyDelete
  10. jedhe n indira cha ekankikemule alela jadpana n ugacha seriouspana garware ne khup changlya prakare dur kela.....!! purvagrahadushit ya bhavnene comment keli ahe asech ekandarit vatatey.....!!

    ReplyDelete
  11. hi girish, thanks karan natake pahayla milat naslya tari vachun anubhavaila miltat.

    ReplyDelete