Tuesday 30 August 2011

Revised Ratings and probable plays in the final

Hello All

Thanks for reading my reviews patiently.

Today is the last day at Purushottam. Throughout the competition we experienced lot of good performances and some very innovative concepts. It's time to revise the ratings.

I can understand that there are some loop holes in previous ratings scale. But from this year's experience - having seen each and every play patiently - I can really say - how difficult judges's job is. It's really hard to have rankings and ratings and each system of rating has its own loop holes in it.

But yes - we can have a general idea of how colleges have performed this year. I welcome suggestions , comments & disagreements. But again - quality discussion is expected not the blame-game or allegations.

My intention is to have an overall idea about how colleges have performed - and this new revised rating is solely my own view - or my own opinion. It may be wrong ! Judges are more capable than me in selecting final 9 plays.  

Having said that - this new revised ratings don't include today's 3 plays - COEP, PVG Engineering and Trinity College. These three plays can change the whole scenario of the competition. :-) Best wishes to all of them ! I wish all of these colleges make judges's job very hard ! :-)  

Also I won't include MITCOE's play in this list.

Hoping your co-operation !

----------------------------------------------------------------------------------------------------------

Ratings - I have made five main categories namely - A , AB,  B , C & Experimental category.

Category A  

1) BMCC  - Patient
2) Sinhagad Academy - Dumla
3) Cummins - Anvay

Category - Experimental

1) Dnyanganga College - Vaari
2) Sadnyapan Vibhag - Godauun

Category AB - 

1) VIIT - Emotional Locha
2) Kaweri College - Gaavgundi
3) Sinhagad College of Engineering - Hey There Delilah!  ( Comedy genre )
4) MMCC - Logging out

Category B 

1) Dhole Patil College - Teen chaaki Abhaal
2) PVG - 7.5 on Richtor Scale  ( Experimental )
3) IMCC - PL ki SRK
4)  VIT - Uttarardha
5) Sinhagad Architecture - Tutse Naaraaj Nahi Jindagi  ( * )
6) SKN College - Raajdand
7) MMCOE - saavalya
8) ILS - Catch 22

Category C 

1) MIT - Prashnachinha
2) Modern Arts Science and Commerce College - Boys
3) Indira College - Laaldastaa
4) Garware college - Aati Rahengi Bahare
5) Raamkrushna More Mahavidyalay - Navas
6) Fergusson College - Raavipaar 

Monday 29 August 2011

29 August - VIIT, VIM , Dhole Patil College of Engineering

1) VIIT - Emotional Locha 

   Subject - The reality in reality shows and the reality in the lives of the people who create reality shows.

   Story - Gautami - the protagonist of the play is the anchor of a new reality show called Emotional Locha. The show is about solving the problems occurring in people's day to day life - same like Emotional Atyachaar. The brutality and capitalistic & opportunistic nature of the reality show brings frustration in Gautami's life. She quits the show but her friend Bhavin asks her to do it for the last time. She agrees. Eventually she herself becomes the victim of the plan and so called last Extreme Emotional Locha episode. The past of the characters and their histories are revealed in between.

लेखन - गौतमीने देशपांडे ने चांगला प्रयत्न केला आहे पण विषयाची खोली गाठणे गरजेचे वाटते. प्रसंगांच्या सादरीकरणात विषयाची खोली आहे - अशी गल्लत झाल्याचा फील येत होता. 

दिग्दर्शन - संहितेस धरून ! 

अभिनय - ठीक. The depth of the characters is reflected in frontal nature of their representation on the stage. 

प्रकाशयोजना - उत्तम. 

पार्श्वसंगीत - नाटकासाठी कंपोज केलेले शो चे गाणे छान होते. बाकी पार्श्वसंगीत उत्तम. 

नेपथ्य - पूरक. 

इमोशनल लोचा नक्की काय झालाय आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात - ह्या मूळ विषयाच्या खोलात नाटक शिरलेच नाही. नाटक सुरु झाल्यावर हे उघडपणे कळलेले असते कि हा इमोशनल लोचा ह्या पात्रांच्या वैयक्तिक आयुष्यात उलटणार आहे - त्यामुळे फक्त तो आता कसा उलटतोय एवढाच मुद्दा उरतो ! बर तो ज्या प्रकारे गौतमी वरच उलटतो - त्यात एवढा एक्स्ट्रीम लोचा तो काय होता हेच कळत नाहीये. कपल्स मधले मतभेद हा इतका बाऊ करण्यासारखा एक्स्ट्रीम लोचा खरच आहे का - याचा विचार व्हायला हवा. उलट त्यापेक्षा नाटकात सुरुवातीला दाखवलेले लोचे जास्त भीषण होते. हा इमोशनल लोचा स्वतःवरच उलटणार आहे - हा ट्विस्ट वाटत असेल तर त्याची चुणूक सुरुवातीच्या ५ मिनिटातच येते. मी बोल्ड अक्षरात लिहिलेल्या मुद्द्याचा खरच सखोल विचार करणे गरजेचे आहे. But the performance was good. 


Overall Rating -    6.5 - 7.0 
--------------------------------------------------------------------------------------------------------------
2) VIM - Soniya 

    Subject - The hype - blind following of something or someone in life.

    Script - Okay.

    Direction - Okay. The form used was free form.

    Acting - Average.

    Lights - Good.

    Set - Average.

    Overall Rating - 5.5 - 6.0

--------------------------------------------------------------------------------------------------------------

3) Dhole Patil College of Engineering - Teen Chaki Abhal 

    This play was a perfect melodrama. People use the word  'melodrama' these days in a very wrong sense. This play was well directed - the characters were thoughtfully developed through their emotions - actions etc.  

    Story - It was a story of a rikshaw wala say - Anna. Anna is a very noble person and very humble, kind, honest character. He is a poor fellow. His son has a very callus attitude towards his wants - and he doesn't think about his family's economical conditions. Anna's daughter is a matured girl. Wife is a typical wife. One day Anna's son demands 500 Rs. Anna goes out to work extra to earn the money. When he returns in the morning - he hears a news about a rape case. His son thinks that Anna did this. Coincidentally the witness of the incident watches Anna's number plate because of which Anna gets caught. Somehow it gets proved that Anna hasn't done it. The bad luck of Anna continues with the people around him blaming Anna for the girls's rape case. Anna's daughter's arranged marriage gets broken. Eventually Anna hears from Bala's ( another rikshaw driver )  mouth that he is the real culprit. Bala is highly drunk that day - Anna forces him to come to police station but Bala meets with an accident and he dies. People blame Anna for Bala's death. Finally Anna commits suicide.


कथा वाचताना ती अतिरंजित वाटण्याची शक्यता आहे - पण यातले सर्व प्रसंग एकाच माणसाच्या आयुष्यात घडू शकतात ही शक्यता आपण नाकारू शकत नाही. किंबहुना मेलोड्रामा ह्या फॉर्म चे हेच वैशिष्ट्य आहे. 

लेखन - चांगले. 

दिग्दर्शन - ह्या नाटकाची खरी ताकद त्यातल्या दिग्दर्शनात आहे. सुरुवातीला वेगवेगळे रिक्षावाले समाजात आहेत - हे दाखवण्यासाठी प्रत्येक रिक्षा मध्ये लागणारी गाणी वेगळी वेगळी वापरणे - येथे विचार केल्याचे जाणवते. अण्णाचा समजुतदारपणा - त्याचे कनवाळू असणे - त्याचे उदार असणे - हे अख्ख्या नाटकभर वेगवेगळ्या माध्यमातून रंगवले आहे. मुलाने हट्टाला पेटून पैसे मागितल्यावर आण्णा जेंव्हा घराबाहेर पडतो - तेंव्हा त्याच्या एक्सिट च्या वेळेस त्याची मुलगी कळशीने पाणी घरात आणताना दाखवली आहे - एका अत्यंत छोट्या एन्ट्री मधून किती विचार केलाय याची प्रचीती येते. मुलीने घराच्या बाहेर एक कुंडी ठेवलेली असते - त्याचे प्रयोजन खूपच सुंदर वाटले - रिक्षावाल्याच्या घरात वाढलेल्या समजूतदार मुलीची सगळी स्वप्ने - तिच्या इच्छा आकांक्षा - त्या एका कुंडीतल्या छोट्या रोपाच्या तिथे असण्यातून परिणामकारकपणे उधृत होतात. भावाच्या एन्ट्री ला त्याने त्या कुंडीत चूळ भरणे - त्याच्या पात्राबद्दल क्षणार्धात प्रकाश टाकतात. एका सीन मध्ये रस्त्यावरच पिवळ्या काळ्या रंगाचा प्लाटफॉर्म - अगदी घराच्या आत पर्यंत घुसलेला असणे - यातही विचार केल्याचे जाणवते. बाळा भुजबळ - त्याचा साथीदार - तिथला दक्षिणात्य माणूस - आणि आणखीन एक सद्वर्तनी गरीब रिक्षावाला यांची पात्रेही व्यवस्थित रंगवली गेली होती. त्या दुसऱ्या गरीब रिक्षावाल्याचे एन्ट्री झाल्या झाल्या तिथला एक पेपर घेऊन वाचणे - ह्या एका कृतीतून त्याचे पात्र लख्खपणे उभे ठाकते. शेवटी अण्णाचा मुलगा त्याचा शर्ट घालून बाहेर पडणे - आणि रिक्षावरून हात फिरवणे - सुंदर. रिक्षाला छत नसतानाही केवळ - अण्णाच्या मुलाचे रिक्षाच्या टपावरून हात फिरवणे - ह्या एका कृतीतून - नाटकाच्या नावाला न्याय मिळवून दिला आहे. अनेक बारकावे आहे - जेवढे रिक्षात :-) सॉरी लक्षात ;-)  राहिले तेवढे लिहिले आहेत. आजची सर्वोत्तम एकांकिका म्हणायला हरकत नाही. 

अभिनय - अण्णाचा सुरुवातीचा अभिनय खूप सहज वाटत होता. नंतर नंतर मात्र तो काही प्रमाणात खटकतो. अण्णाच्या बायकोने चांगले काम केले आहे. अगदी सुरुवातीच्या पुणेरी खवचट म्हाताऱ्यानेही चांगले काम केले आहे. आण्णा नाटकाच्या मध्यातच जेंव्हा - आजूबाजूच्या परिस्थितीवर अत्यंत मार्मिक मोनोलोग वगैरे म्हणतो तेंव्हा मात्र - याची काहीही गरज नव्हती असे मनापासून वाटते. एकंदरीत अभिनय अजून जास्त चांगला होऊ शकला असता. 

प्रकाशयोजना - चांगली. 

नेपथ्य - उत्तम. रिक्षा stand वरची वर्तमानपत्रे - त्यावरची सूचना - घरातले अत्यंत कमी पण अत्यंत गरजेचे एवढेच असे नेपथ्य - सुंदर.  स्टेज च्या diagonal dimension चा केलेला वापर चांगला होता. 

संगीत - टिपिकल मेलोड्रामा ला साजेसे असेच.


Overall Rating - 7.0 - 7.25    


Sunday 28 August 2011

28th August - Modern Ganeshkhind, Kashibaii Navale Engineering , Dnyanganga Engineering College

1) Modern Ganeshkhind - Vaadhdivas

   Subject - Kasab

   Story : Kasab commits suicide.

   Script : Average.

   Direction - Average.

   Lights - Average.

   Set - Average.

   Background Music - Average.

   ह्या कोलेज कडून खूप अपेक्षा होत्या - अत्यंत शब्दबंबाळ आणि भाबडी संहिता होती ! :(

   Overall Rating - 3.0 - 4.0

--------------------------------------------------------------------------------------------------------------

2) Kashibaii Navale Engg. College - Raajdand 


    Subject - Corrupt social system. 


    Story - There are 5 positions to be filled for the post - Communication Officer in Sachivalay - Mumbai. Three candidates - two boys and a girl - with high qualifications appear for the interview. All of them does a great job in interview and each one is confident to get this job. But all of these positions are filled by the referrals of politicians. These three candidates could see that there is hell lot of corruption in appointing the officers on these posts. They try to protest. They somehow manage to get the file containing the details about how they perform in an interview. They catch the officer named - Tamhankar - who did all this. Eventually they think of making a change in this so called system and they steal the national flag which is going to be used in flag hosting ceremony on 15th August. The play ends with Vinda Karandikar's poem in chorus - Mazya Mana Ban Dagad 


    Script - Good. The frustration of the three candidates was portrayed with correct dialogues. 


    Direction ह्या नाटकाचे दिग्दर्शन संहितेला धरून होते. तीनही उमेदवारांचे समुद्राच्या किनारी ठेवलेल्या सिमेंट च्या ब्लॉक्स पाशी येऊन नैराश्य बाहेर काढणे - अप्रतिम संकल्पना होती. समुद्रकिनारी जसे हे ब्लॉक्स हजारांच्या संख्येने उन-वारा-पाऊस कोणत्याही तक्रारीशिवाय झेलतात - किंवा निर्जीवपणे अव्याहतपणे हा मारा सहन करत असतात - हे ह्यातून दाखवायचे होते. हे ब्लॉक्स म्हणजे कोणताही प्रतिकार न करणाऱ्या समाजातले असंख्य तुम्ही आम्ही सगळे - आणि ह्यांच्या पुढे हे तीन उमेदवार उभे ठाकले आहेत - ही प्रतिमाच अप्रतिम होती. उमेदवारांच्या निवडीची प्रोसेस सुद्धा चांगली रंगवली होती. मुलाखत घेणारे तीनही अधिकाऱ्यांचे काम अजून चांगले होऊ शकले असते ! त्यातही चष्म्याच्या आडून जो अधिकारी बघत होता - त्याचे तसे बघणे - आणि त्याचा तो लूक - यथायोग्यच होता. शेवटच्या १० मिनिटात - नाटक परिणामकारक करण्याच्या फंदात - भरकटत गेले असे वाटले. - माझ्या मना बन दगड - ही कविता नैराश्य अधोरेखित करताना योग्य वाटत होती - पण शेवटी - " ऐका टापा ऐका आवाज - लाल धूळ उडते आज " - हा रेफरन्स विंदांनी - communist विचारसरणी साठी वापरला आहे - तो नाटकाच्या शेवटी आल्याने - " पुन्हा कम्युनिस्ट यावेत आणि क्रांती घडवून आणावी " हा संदेश मुलांना द्यायचा आहे कि काय - असे वाटण्याची शक्यता आहे. त्या ओळींमधली - लाल धूळ - कम्युनिस्ट विषयक आहे - हे विचारात घेणे महत्वाचे आहे. नाटकाच्या शेवटी - नाटकाने आत्तापर्यंत राखलेला वास्तववादी फॉर्म सोडला - आणि उगाचच पथनाट्याच्या फॉर्म मध्ये घुसले. एकंदरीत खूप चांगले दिग्दर्शन होऊ शकले असते. नोकरी न मिळणे - म्हणजे अस्तित्व न उरणे - इतपत ज्या लोकांची अवस्था असते - त्यांची तडफड बाजूलाच राहिली - आणि उगाचच क्रांती वगैरे करण्याच्या नादात - नाटक भरकटले.

अभिनय - नाटकाची सुरुवातच त्या मुलीने अत्यंत नाटकी आवाजात आणि अभिनयात केली. कोणीही लक्षात राहील असा अभिनय केला नसला तरी सर्वांनी नाटकाला कुठेही बोअर सुद्धा होऊ दिले नाही हेही खरे. केबिन च्या बाहेर बसलेल्या - बायीने चांगला संयत अभिनय केला. एकंदरीत खूप सुधारणा गरजेची आहे. 

नेपथ्य - सुरेख. 

प्रकाशयोजना - उत्तम. 

संगीत - ठीक. 

Overall Rating - 6.5 - 7.0 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

3) Dnyanganga Engineering College - Vaari 

अत्यंत फ्रेश आणि सुरेख नाटक ! 

संकल्पना - ह्या नाटकाला एक कथा अशी नव्हती. वारी - हा समान धागा होता. नाटकाची सुरुवात वारीने झाली. सुरुवातीतच नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली. सुरुवातीपासून एक वारीत सामील होणारा एक - म्हातारा वारकरी जो होता - तो फारच अप्रतिम काम करत होता - अत्यंत सुरेख. पण तो नंतर आलाच नाही. त्याचे बघणे- पाठीत वाकणे - हात थरथरणे फारच अप्रतिम होते. त्याची अभिनयाची समजही खूप आहे हे जाणवत होते. 

वारी - ह्या एका शब्दाच्या वेगवेगळ्या पैलूंना स्पर्श करत नाटक पुढे सरकत होते. मग खरी-खुरी वारी, शिक्षणातली मुलांची वारी, नेत्यांच्या भाषणांना गर्दी करणाऱ्या लोकांची वारी असे अनेक प्रसंग येऊन गेले. नाटकाच्या मध्यात - नाटकाच्या मुख्य कथेस सुरुवात झाली. प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेस कंटाळलेला एक मुलगा अभियांत्रिकीला प्रवेश मिळवतो. आणि मग - कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाशी संबंध नसलेल्या अश्या एका शिक्षण व्यवस्थेशी त्याचा सामना होतो. एकीकडे हा मुलगा आणि दुसरीकडे शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने निराश झालेला एक शिक्षक अश्या दोन मार्गांवर मग नाटकाचा प्रवास सुरु होतो. शिकवण्याच्या पवित्र अश्या कार्यात - ह्या शिक्षकाची खूपच घालमेल होत असते - कारण त्याच्या कडे काहीतरी शिकायचंय म्हणून येणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा - मार्क्स पाडण्यासाठी व घोकंपट्टी करण्यासाठी नोट्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचीच रीघ त्याच्याकडे लागते. शिक्षकी पेशात आपला विठ्ठल शोधणाऱ्या ह्या शिक्षकास आता त्याचा विठ्ठल गवसेनासाच होतो. शेवटी ह्या विद्यार्थ्याची आणि ह्या शिक्षकाची भेट होते - आणि जणू अगदी प्रामाणिक भक्ताला विठू मिळावा आणि विठूलाही अगदी प्रामाणिक भक्त मिळावा - अशीच दोघांची अवस्था होते. शिक्षकास पुन्हा एकदा शिकवण्यामध्ये - विठू दिसायला लागतो. :-) 

दिग्दर्शन - सुंदर. वारीचे प्रसंग - त्यातले उपरोधिक टोमणे - शिक्षकाची कुचंबणा - घालमेल - विद्यार्थांची होणारी कुचंबणा - अप्रतिम रंगवली होती. शेवटी शब्दशः होणारे विठूचे दर्शन - कळस होता. :-) विषय मांडण्याची कुठेही घाई नाही - कोणताही अभिनिवेश नाही ! नाटकाचा ठेहेराव नाटकाला वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला. 

अभिनय - चांगला. वारीतला म्हातारा - आणि कीर्तनकार - उल्लेखनीय ! कीर्तनकाराच्या आवाजाने रसिकांच्या मनांना जिंकले. पण त्याने शेवटी जे जोग रागातले भजन गायले - ते त्याने शास्त्रीय गायक जसा गाईल त्या बेअरिंग मध्ये गायले - तेच जर त्याने शिक्षकाच्या बेअरिंग मध्ये गायले असते - तर मन अधिक भरून आले असते. इतर कलाकारांच्या अभिनयात सुधारणा करण्याची खूप जास्त गरज आहे. किंबहुना - कीर्तनकार आणि शिक्षकानेही वेगवेगळ्या भूमिका वठवताना - वेगवेगळ्या प्रकारचे बोलणे अपेक्षित आहे - तो शिक्षकाचेही काम करताना कीर्तन्कारासाराखाच बोलत होता. एकंदरीत अभिनय अजून खूपच जास्त चांगला होऊ शकतो. 

पार्श्वसंगीत - अभंगांचा - भजनांचा वापर सुंदर. एकंदरीत छान ! 

प्रकाशयोजना - उत्तम. 

नेपथ्य - पूरक आणि पुरेसे.  

प्राथमिक फेरीच्या दृष्टीने नाटकाने जेवढे मार्क्स पडणे अपेक्षित आहे तेवढे नक्कीच पडले आहेत. पण फायनल च्या दृष्टीने नाटकाची वीण अजून जास्त घट्ट बसवणे गरजेचे वाटते. हे एक उत्तम नाटक आहे - आणि क्रमांकात येण्याच्या दृष्टीने असलेल्या सगळ्या गोष्टी ह्यात आहेत !  

अभिनंदन ! :-)

Overall Rating - 7.5 


28 August - Morning Session - Appasaheb Jedhe , Indira College of Commerce & Garware College

1) Appasaheb Jedhe Mahavidyalay - Mohor 

कथा - आंब्यांचे पीक घेणाऱ्या एका बागायतदार शेतकऱ्याची ही कथा ! एके वर्षी त्याच्या आंब्यांच्या झाडांना भरपूर मोहोर येतो. घरातला प्रत्येक जण - आता घरात सुखसमृद्धी नांदणार म्हणून स्वप्ने रंगवत असतो. गावातल्या व्यापाराशी झाडांच्या विक्रीबाबत बोलीही ठरते. पण मुसळधार पावसात सगळा मोहोर नष्ट होतो. शेतकरी स्वतःच्या नशिबावर खूप रागावून झाडे तोडायला निघतो. पण त्याचा लहान मुलगा त्याला सावरतो. शेवटी - तो मुलगा बापाची स्वप्ने उराशी बाळगतो आणि दुसऱ्या वर्षीच्या फुललेल्या मोहोरात - आणि पर्यायाने येणाऱ्या सुखसमृद्धी मध्ये हरवून जातो. 

लेखन - साधे -सरळ लेखन होते. कुठेही साहित्यिक बडेजाव नव्हता. पण सुरुवातीला खूपच भोळसट पात्रे रंगवली आहेत - अश्या प्रकारचे लेखन होते. 

दिग्दर्शन - खूपच जास्त वेळा black outs होते. स्वप्नंरंजनाचे प्रसंग चांगले रंगवले होते. शेतकऱ्याचे मनातून उध्वस्त होणे - अभिनयातून अधिक परिणामकारकपणे दाखवता येऊ शकले असते. त्या प्रसंगात एकंदरीतच खूप आरडा ओरड झाली. पालखी येण्याच्या प्रसंगाची फारशी गरज वाटली नाही. शेतकरी अत्यंत सद्वर्तनी आणि प्रसन्न रंगवण्याच्या नादात - सुरुवातीचे प्रसंग फारच लाडिक लाडिक झाले असे वाटले. त्याचे पात्र रंगवणारा सारखाच प्रसन्न हसण्याचा प्रयत्न करीत होता. एकंदरीत सर्व दिग्दर्शन फक्त वर-वरच्याच पातळीवर राहिले असे वाटले. 

अभिनय - ठीक. 

नेपथ्य - मोजके . आंब्याची झाडे स्टेज वर न आणण्याचा निर्णय चांगला होता. :) 

प्रकाशयोजना - चांगली. झाडांसाठी वापरलेला हिरवा लाईट अजून जास्त शार्प करता आला असता. एकंदरीत चांगली. 

पार्श्वसंगीत - काही वेळा खूप जास्त लाउड वाटले. पण एकंदरीत समाधानकारक. 

नाटकाचा शेवट - नाटकास 'मोहोर' हे नाव का दिले याचे विश्लेषण करण्यात झाला - ते थोडे खटकले. एखाद्या सिरीयल चा एपिसोड संपावा तसे नाटक संपले. 

Overall Rating - 6.0

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

2) Indira College of Commerce - Laadasta 


विषय - नक्षलवादी चळवळ - तरुण त्यात कसे ओढले जातात - त्यात ओढल्या गेलेल्यांची सरकार आणि स्वतः त्यांच्यामुळेच कशी दुतर्फा गळचेपी होते इत्यादी ! 

कथा - ( पात्रांची नावे चुकल्यास कृपया माफ करा ) म्हादू आपल्या हलाखीच्या आयुष्याला - व त्यात गुदरलेल्या अन्यायाच्या प्रसंगांना कंटाळून नक्षलवादी लोकांना सामील होतो. तिथे एक दिवस त्यांनी गावातल्या शिक्षिकेस पळवून आणलेले असते. म्हादू शिकलेला असतो. त्या दोघांचे स्वभाव आणि मते जुळतात. एके दिवशी पोलीस स्टेशन वर केलेल्या हल्ल्यामध्ये - म्हादू नक्षलवादी लोकांना सामील झाल्याचे पोलिसांना कळते. शेवटी म्हादू आणि शिक्षिकेच्या मदतीने पोलीस 'लालदस्ता' संघटनेचा खात्मा करतात. :-) नाटकाचा शेवट म्हादू आणि शिक्षिका यांना अपत्य होऊन होतो. 

लेखन - जे हजार वेळा आपण ऐकत आलोय नक्षलवादी संघटनेबाबत तेच मांडले होते. पात्रांची खडाजंगी वगैरे रंगवण्यात लेखक काही प्रमाणात यशस्वी झाला असला - तरी नाटक तेवढ्यापुरतेच राहिले. 

दिग्दर्शन - लेखन व दिग्दर्शन जशास तसे होते. 

अभिनय - मुलीने चांगला अभिनय केला. ( शिक्षिकेने ) म्हादू कधी कधी अभिनय करतोय असे जाणवत होते. नक्षलवाद्यांच्या म्होरक्याने चांगला अभिनय केला. एकंदरीत सर्वांचा अभिनय चांगला होता. 

नेपथ्य - ठीक-ठाक 

प्रकाशयोजना - ठीक. 

पार्श्वसंगीत - ठीक.

Overall Rating - 6 - 6.5 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

3) Garware College - Aati Rahengi Baharen ! 

कथा - साधी सोपी भोळी भाबडी कित्ती कित्ती गोड ! नववीच्या वर्गातल्या नवीन वर्गशिक्षिका दिसायला - वागायला - बोलायला खूपच गोड असतात बुवा ! इतिहासाचे शिक्षक तर खूप्पच छान असतात दिसायला - सगळी मुले बायींवर आणि सगळ्या मुली सरांवर मारत असतात. पण आपल्या वयाचा विचार करता - आपले काही त्यांच्याशी सुत जुळणे शक्य नाही - हे बालकांच्या लक्षात येते. मग ते सरांचं आणि बयींच सेटिंग करायचा जबरदस्त प्लान करतात. वर्गात दुसऱ्या एक शिक्षिका असतात - ज्या ह्या मराठीच्या बायींवर खूप जळत असतात. त्या मुलांना सारख्या सारख्या मारत असतात. मुलांना त्यामुळे त्या मुली अज्जिबात आवडतच नसतात. आणि एक गम्मत सांगू का - मुले कष्टाने हे जे जुळवून आणत असतात ना त्याचा मुली काही उपयोगच नसतो - हे हे हे हे - कारण सरांचं आणि बयींच तर आधीपासूनच प्रेम असतं ना ! पण अत्यंत निरागस ( ??? ) मुलांना मात्र हे माहीतच नसतं. सो स्याड ना :( :( :( आणि हौऊ स्वीट पण ! :):):) शेवटी शाळेचे अधिकारी या प्रेमीयुगुल सर आणि बायींना बडतर्फ करतात ! तेवढ्यात तिकडून दुसऱ्या शिक्षिका येताना मुलांना दिसतात आणि - त्यांच्यावर मुले एकदम लट्टू होतात ! कित्ती कित्ती कित्ती गोड ना ! 

लेखन - खूप खूप खूप स्वीट ! :) 

दिग्दर्शन - एकंदरीत लेखन खूप खूप खूप स्वीट असल्याने दिग्दर्शन म्हणजे तर काय - जम्माडी - जम्माडच ! :) 

नेपथ्य - वर्ग - टेकडीवरचा बाक ! 

प्रकाशयोजना - चांगली. 

पार्श्वसंगीत - ते तर आमचा गुपितच आहे बाबा ! छान ! 

Overall Rating - 5.5 - 6.0 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Saturday 27 August 2011

27th August - ILS , Symbiosys Arts and Commerce College , Shankarro Chavan law College

1) ILS - Catch 22 

    Subject - Tensions between a husband and wife because of career , unwanted pregnancies etc.

    Story : A husband wants a child but the wife doesn't want. She feels that it's better not to have a child rather than having an unwanted child. She herself is an unwanted child of her parents. Her husband is a happy go lucky kind of a person who desperately wants to experience the fatherhood. Eventually she undergoes an abortion and he decides to get a divorce.

   Script - Good.

   Direction - Above average.

   Set - Good.

   Lights - Decent.

   Music - Good.

   नाटकाची सुरुवात अत्यंत कमी संवादांनी पण परिणामकारक झाली. पण नंतर नंतर नाटकाची पकड सुटत गेली. पात्रांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या वेदना - जेवढ्या तीव्रतेने पोहोचणे अपेक्षित होते - तेवढ्या त्या पोहोचल्या नाहीत. नाटकात एक चांगले वाक्य येऊन गेले - " तुझ्यातला माझा अंशच उरला नाहीये तर मग आपण एकत्र राहून तरी काय करायचं " ! नाटकातल्या नवऱ्याचे काम ज्याने केले - त्याची आवाज लावण्याची पद्धत कानांना अत्यंत एकसुरी वाटत होती. काही ठिकाणी तो उगाचच ओरडतो आहे असे वाटत होते. मुलीचा अभिनय खटकणारा नसला तरी - तुटक तुटक वाटत होता. नाटक कोणत्याही विषयाच्या खोलात न जाता संपले असे शेवटी वाटले. 

   Overall Rating - 6.0 - 6.5 

--------------------------------------------------------------------------------------------------------------

   2)  Symbiosys Arts and Commerce College - Shahanpan Dega Deva 

    Story - A man called Mr. Bhide wants to get admitted to Mental Hospital - because he is frustrated because of the system around him.  :-(

    Script - Average.

    Direction - Average.

    Set  - Average.

    Music - Average.

    Lights - Very very average.

    Overall Rating - 4.5 - 5.0 

--------------------------------------------------------------------------------------------------------------

3) Shankarraoo Chavan Law College - Tatkalik Satyache Varkari 

कथा - एका युवकाला - संत तुकारामांचा मुखवटा चोरल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी पकडलेले असते. पण तो काही केल्या त्याचा गुन्हा मान्य करत नसतो. एक दिवस पोलीस इन्स्पेक्टर आणि हवालदार ठरवतात कि त्याच्याकडून गुन्हा कबूल करूनच घ्यायचा. पण खूप प्रयत्न करूनही त्यांचा नाईलाज होतो. दुसऱ्या सीन मध्ये त्या युवकाच्या मनात तुकाराम प्रकट होतात. दुसरीकडे ह्या पोलीस ठाण्यामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्याला - वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या आरोपाखाली अटक केली जाते. शेवटी - तुकारामांचा मुखवटा चोरणारा चोर मुस्लीम आहे असा जबरदस्तीने कबुलीजबाब लिहून घेतो. ह्या खुलाश्यामुळे जातीय दंगली होतात. शेवटी पांडुरंग तुकारामांच्या रुपात प्रकट होतो आणि त्या निरपराध चोराची सुटका करून देतात. अर्थात हे रूपकात्मक आहे. 

लेखन - लेखन चांगले होते. लेखनातल्या घडण्यात चांगले नाट्य होते. प्रत्येक माणूस फक्त स्वतःच्या सुखाच्या पोटी दुसऱ्याचा बळी देतोय - आणि त्याच आमिषांना - तात्कालिक सत्य मानायला लागलाय - म्हणून तात्कालिक सत्याचे वारकरीच हल्ली खूप झालेत - अश्या आशयाचे हे नाटक होते. पण स्क्रिप्ट मधल्या बऱ्याच गोष्टी एडिट करता येण्याजोग्या होत्या - त्यामुळे नाटक अजून जास्त चांगले झाले असते. 

दिग्दर्शन - पूरक. नाटकातले तणावाचे प्रसंग चांगले दिग्दर्शित केले होते. 

अभिनय - चांगला. 

नेपथ्य - चांगले होते. 

प्रकाशयोजना - चांगली. 

नाटकाने मध्यात पकड सोडली. तुकारामांची स्वगते गाळता आली असती. तुकारामांचे शेवटी चोराला सोडवणे - जातीय दंगली म्हणून लुटुपुटूची भांडणे करणे - बायका येऊन दिंडी चे नृत्य करणे - ह्या गोष्टींमुळे नाटक उगाचच वाढले आणि अपेक्षित परिणामापासून दूर दूर जात गेले. खरं तर हे नाटक खूप चांगले होऊ शकले असते. 

Overall Rating : 5.5 - 6.0 

----------------------------------------------------------------------------------

26 September - Annasaheb Magar, PICT , DES Law College

1) Annasaheb Magar - Panyachi Kamal Chorachi Dhamal 

    Subject : Scarcity of water and politics around this issue.

    Story : A thief has a last bottle of water left on the earth. All people on this earth are after him for his bottle. During his journey he meets a couple, a politician etc. Finally all people come together to save this earth.

    Script - Average.

    Direction - Average.

    Acting : Above average.

    Set - Minimal

    Music - Above average.

    Lights - Good.

    Overall Rating : 5.0 

--------------------------------------------------------------------------------------------------------------

    2) PICT - Mokshmulayam Putalakrupa 

सर्वात घनघोर अपेक्षाभंग करणारी एकांकिका ! 


विषय - पुतळ्याच्या हलवण्यावरून होणारे राजकारण 

कथा - शहरात मेट्रो रेल्वे येणार असते. ती ज्या मार्गावरून जाणार असते - त्याच्या मध्ये एका व्यक्तीचा पुतळा उभा असतो. शहरातले दोन नगरसेवक ह्या विषयावरून एकमेकांवरून खार खाऊन असतात. शेवटी दोघांच्या संगनमताने पुतळा हलवण्यात येतो. नाटकाचा शेवट एका ढिंच्याक गाण्याने होतो ज्यावर सगळे नाचताना दाखवले आहेत. 

लेखन - सुमार 

दिग्दर्शन - सुमार 

नेपथ्य - शेवटच्या विंगेमध्ये रांगेत मांडून ठेवले होते. पुतळा हा अविभाज्य घटक होता. नेपथ्य बऱ्याच औंशी प्रतीकात्मक होते. एकंदरीत ठीक-ठाक ! 

अभिनय - अत्यंत सुमार 

पार्श्वसंगीत - ठीक-ठाक 

प्रकाशयोजना - ठीक.    

Overall Rating - 3.0 

--------------------------------------------------------------------------------------------------------------

   3) DES Law College - Ahuti 


विषय - गांधी वधाच्या पार्श्वभूमीवर गावातल्या एका अत्यंत सुस्वभावी ब्राम्हणाची होणारी वाताहत. 

कथा - अत्यंत उदार - सुस्वभावी ब्राह्मणाची त्याच्या गावात खूप जास्त पत असते. पण गांधीवधानंतर गावकरी त्याचे सारे घर लुटून नेतात. पण तरीही शेवटी तो गावकऱ्यांना मदत करतो ! 

अभिनय - चांगला. 

दिग्दर्शन - ठीक. खूप विचार केला होता असे वाटले नाही. अर्थात कथाच - एकाच पातळीवर घडत असल्याने फार काही करण्याजोगेही नव्हते. 

नेपथ्य - मोजके. 

पार्श्वसंगीत - खूप जास्त. भडक. 

Overall Rating : 5.0 - 6.0 

----------------------------------------------------------------------------------


Friday 26 August 2011

25 August - BMCC, SIT , Cummins Engineering College

 आजच्या तीनही नाटकांनी अपेक्षा या न त्या प्रकारे पूर्ण केल्या असे म्हणता येईल. पुरुषोत्तम २०११ चा सर्वात यशस्वी लॉट होता असे म्हणल्यास वावगे ठरू नये.

1) BMCC  -  Patient 

STORY वसू ( नाव चुकीचे असू शकेल ) लिव्हर क्यान्सर चा रुग्ण असतो. वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी त्याच्या नशिबात ह्या असाध्य रोगाशी झगडणे लिहिलेले असते. सुमारे २-३ वर्षे ह्या रोगाशी सामना करून अखेरीस तो ह्या वेदनेतून सुटतो - इतकी साधी सोपी सरळ गोष्ट होती. 


दिग्दर्शन - गेले काही दिवस मी जे - कथेचे नाटकात रुपांतर करताना - वेगळ्या वाटांचा शोध घ्यावा लागतो - असे म्हणतोय ते आजच्या नाटकात बघावयास मिळाले. वसू चे क्यान्सर ने आतून पोखरले जाणे - त्याचे वेदनेने तडफडणे - ह्यांची अभिव्यक्ती करण्यासाठी - ड्रिलिंग मशीन चा केलेला वापर - धातूच्या हातोडीने पडणारे घण - ह्यांचा उत्तम वापर करण्यात आला. करवतीचे - घणांचे आवाज , ड्रिलिंग मशीन चा आवाज ह्यांचा सुरेख वापर केला गेला होता. शेवटी त्याच्या डोक्यात होणारा असंख्य विचारांचा - भावनांचा गुंता दर्शवण्यासाठी - मागच्या बाजूस केलेला गुंता - अर्थ पोचवण्यास समर्थ होता. भूतकाळातल्या गोष्टींचा उल्लेख करताना - गादीखालील वापरलेला लाईट उत्तमपणे पोचला. वसूची बेड वरची वेदना व्यक्त करण्यासाठी - बेड उभा करणे - हा प्रयोग बीएमसीसी ने - who let the dogs out - ह्या एकांकिकेत आधीही केला असल्याने - पुनर्प्रत्ययाचा आनंद झाला.  एकंदरीत दिग्दर्शन पूरक होते. 

अभिनय - वसूच्या मध्यवर्ती भूमिकेतील कलाकाराचा अभिनय संयत होता - परंतु मुळातच निवेदनात्मक शैलीचा वापर केल्याने त्याचा अभिनय - वर्णनात्मक इतकाच उरला. बाकीच्यांचा अभिनय पूरक होता. विशेषतः - आई च्या वेशभूशेकडे दिलेले बारीक लक्ष - तिचे पडलेले शुष्क ओठ - चष्मा - ह्या गोष्टींमुळे ते पात्र इतरांपेक्षा उठून दिसले. भावाने केलेला अभिनय सुद्धा वाखाणण्याजोगा असाच होता. एकंदरीत अभिनयाच्या बाबतीत समाधानकारक कामगिरी जाणवली - अर्थात बीएमसीसी कडून तीच अपेक्षा होती - आहे आणि असेल. अभिनंदन ! 

नेपथ्य - उत्तम ! नेटके ! बेड ला गाठ मारलेली एक नाडी - दवाखान्यातला कपाटा वरची गणपतीची मूर्ती - जुना ट्रान्सीस्टर - यांचे प्रयोजन कळत होते. 

प्रकाशयोजना - अप्रतिम ! प्रकाशयोजने मध्ये दिग्दर्शन जाणवत होते. 

पार्श्वसंगीत - सुंदर. ठिबकणाऱ्या पाण्याचा आवाज, कर्वतींचे व ड्रिलिंग मशीन चे आवाज - उत्तम ! पण कुमारांचे - उड जायेगा - हे गाणे वापरणे मात्र - योग्य असले तरी अत्यंत प्रेडीक्टेबल होते. :-) 

नाटक - 'एका पेशंट चे आत्मवृत्त ' ह्या विचारापाशीच राहिले - आणि इथेच नेमके ते कमी पडले. आपल्या मृत्युनंतर आई-बाबांचे काय होईल , शेजारच्या बेड वर आलेली श्रीमंत घरातली मुलगी व तिच्या रोगाचे झालेले अवडंबर , दिवाळी मध्ये वसूच्या खोलीत गेलेले दिवे - ह्या तपशिलांमध्ये नाटक एकाच ठिकाणी विनाकारण स्थिर राहिले ! मग शेवटी काय उरले - तर बुवा कर्करोग झालेला एक रुग्ण अनेक वेदना सहन करून दगावला - एवढेच. नाटकात अजून वेगळे काय करता येईल - त्या वेगळ्या मार्गांमध्ये नाटक अडकून राहिले - त्यामुळे दिग्दर्शन करताना शोधलेल्या नवीन वाटांवर प्रकाश पडला - पण मुळातील पात्राच्या वेदनांपासून मात्र प्रेक्षक चार हात दूरच राहिला ! 

Overall Rating : 7.5 - 8 

----------------------------------------------------------------------------------

2) SIT - Hey there Delyahlah 

विषय - गर्ल फ्रेंड आणि बॉय फ्रेंड मध्ये 'घडणारे' - 'घडवून आणलेले' हास्य विनोद - रुसवे फुगवे - भांडणे - मतभेद - इत्यादी इत्यादी इत्यादी ...... 

कथा - शाळेची सहल गेलेली असताना मुलगा मुलीच्या प्रेमात पडतो. त्यांचे प्रेम डिग्री मिळेपर्यंत टिकते. मुलगी जीआरई देऊन परदेशात जाताना दोघांची भांडणे होतात. मग एक इमोशनल सीन घडतो - ज्यात मुलाला खूप वाईट वाटते. आख्खे नाटक घडताना मध्ये मध्ये कायम - मै हुं ना - सिनेमा मध्ये जसे शाहरुख च्या मागे व्हाओलीन वाजवणारे लोक असतात तसे असतात. आपण नाटक पुढे नेतोय असे वाटणारा - एक सो कोल्ड - लेखक तिथे नाटकात हॉटेल चे काम करीत असतो. प्रेक्षकांमध्ये छान हशा पिकवून नाटक समाप्त होते. :-) 

दिग्दर्शन - २००६ सालच्या ह्याच कॉलेज च्या - फिरोदिया स्पर्धेतील - Back to School - ह्या एकांकीकेशी मिळते जुळते असे दिग्दर्शन होते. मधेच मोबाईल मुळे अगदी हृदयातले बोलायचे कसे राहून गेले वगैरे यावर संवादातून भाष्य वगैरे येऊन गेले. 

लेखन - विनोदी :-) 

पार्श्वसंगीत - उत्तम ! पण पार्श्वसंगीत्कार स्टेज वर खूप वेळा येत होते ! 

सेट - पूरक. चांगला ! 
प्रकाशयोजना - उत्तम ! 

अभिनय - स्नेहाने काम छान केले. इतरांचीही कामे एकुणात छान. मुलाने काम थोडे लाउड केले असे माझे वैयक्तिक मत आहे - यावर मतभेद असू शकतात. 

पर्फोर्मंस चांगला झाला हीच ती काय जमेची बाजू ! १ + १ = २ हे आधीच माहित असल्याने नाटकातून फार काही मिळाले असे जाणवले नाही ! 

Overall Rating - 6.5 - 7 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


3) Cummins College of Engineering - Anvay ! 



ओ हेन्री च्या  The last Leaf - चे नाट्यरूपांतर होते ! 

कथा - मधु आणि मालती ( नावांबाबत माफ करा ) दोघी मैत्रिणी असतात. एकीला चित्रकलेचा छंद असतो आणि दुसरीला लेखनाचा. दोघीही गुरूंच्या शोधात असतात. मधु तिच्या शेजारच्या साधारण ५० वर्षे वयाच्या चित्रकार बायीच्या कलेने खूप जास्त प्रभावित झालेली असते व तिच्या कडे शिक्षण घेण्यास जाते. मालती - गोखले नावाच्या एका लेखकाच्या लेखनाने खूप जास्त प्रभावित झालेली असते - व ती त्यांना गुरु मानत असते. मधु चिकाटीने चित्रकलेचे शिक्षण - त्या पन्नाशीच्या बायीच्या लहरी स्वभावावर मात करून घेत असते - पण मालती मात्र गोखल्यांच्या - तिच्या लेखनावरच्या शेऱ्याने मनातून पार उध्वस्त होते. मालतीच्या घराच्या खिडकीतून - समोर एक वेल तिला दिसत असते. ती मनाशी अशी समजूत करून घेते की ह्या वेलाची सगळी पाने झडून जाईपर्यंतच तिचे आयुष्य शिल्लक राहिले आहे. दरम्यान एके दिवशी चित्रकलेचे शिक्षण घेताना - मधु तिच्या बायींवर खूप चिडते आणि त्यांना त्यांच्या खचून जाण्याची वगैरे जाणीव करून देते. शेवटचे पान शिल्लक असताना मग ह्याच बाई स्वतः हाताने रंगवलेले पानासारखे हुबेहूब दिसणारे चित्र काढून त्या वेलीवर लावतात. मालती मनात विचार करते - जर हे पान ह्या थंडीवाऱ्यापुढे  खंबीरपणे तग धरू शकते तर आपण का नाही ! तिचे मन जगण्यासाठी उभारी घेते - पण स्वतःच्या आयुष्यातली सर्वोत्कृष्ट कलाकृती निर्माण करून मात्र - चित्रकलेच्या शिक्षिका - हे जग सोडून गेलेल्या असतात. 

लेखन - चांगले. नाट्यरूपांतर चांगले केले आहे. 

दिग्दर्शन - चांगले. मालतीचे खचून गेल्यावर - खुंटीला टांगलेली रिकामी शबनम , विझलेला कंदील , जुना धातूचा पंखा , तुळशी वृन्दावानाच्या कोनाड्यात ठेवलेला विझलेला दिवा - छान ! आत्या आज्जीचे मालतीच्या घरात येऊन - गीतेतला पंधरावा अध्याय म्हणणे - व धुपाचा धूर तिच्याजवळ नेणे - त्यावेळी मधूचे आत्त्या आज्जीला अडवणे - अप्रतिम व सूचक. हा क्षण फारच सुरेख होता. चित्रकार बायींचे - चित्र काढण्यापेक्षा त्यातल्या कथेचा मागोवा घ्या असे सांगणे आणि - संगीत - वास - अनुभूती ह्या सगळ्याच माध्यमातून चित्रकला शिकवणे - नाटकाच्या निर्मिती मध्ये विचार केल्याचे द्योतक आहे. सर्वच मुलींची वेशभूषा , भिंतींचा रंग - सुद्धा छान विचार करून केला असल्याचे जाणवत होते. 

प्रकाशयोजना - उत्तम. 

नेपथ्य - सुरेख. नेपथ्य मांडणी , रचना , वापर आणि हालचाल - उत्तम. 

अभिनय - सुरुवातीच्या दोन भवान्या आज्ज्या सोडल्यास सगळ्याच मुलींचा अभिनय चांगला झाला. फक्त मधु जशी प्रौढ वाटत होती तशी मालती सुरुवातीला अत्यंत बालिश वाटत होती - त्यामुळे जेंव्हा गोखल्यांच्या शेर्यामुळे ती हाय खाते - तेंव्हा प्रेक्षकांना ती आधीपासूनच बालिश वाटत असल्या कारणाने  नंतरच्या तिचे खचून जाणे देखील सुरुवातीला बालिश वाटण्याची शक्यता आहे. पण मालतीने नंतर उत्तम काम केले.  चित्रकार शिक्षिका बायींनी चांगले काम केले. मधून मधून डोकावून जाणारी आत्या आज्जी - ठीक ठीक ! सर्वच मुलींचे आवाज मात्र खणखणीत होते. अभिनंदन ! 

नाटकातली पात्रे जशी वागताहेत, तशी ती का वागताहेत - ह्यातल्या बारीक तपशिलांकडे लक्ष दिल्यास नाटक उघडे पडेल की काय अशी भीती मात्र वाटते. मुळातली कथा रूपक कथा आहे. रूपक कथेचे वास्तव कथे मध्ये रुपांतर करताना - त्यातले रूपक - वास्तवातल्या पात्रांच्या वर हावी झाल्यास - ती पात्रे वास्तवापासून भिन्न असे वर्तन करू लागतात. त्यामुळे रूपक आणि वास्तव यांचा एक प्रकारचा balance साधावा लागतो. ह्याच ब्यालंस ला ह्या नाटकात मधून मधून धक्का लागत होता ह्याची प्रचीती आली.  त्यामुळे नाटक पात्रांच्या मनोव्यापारांपर्यंत नं जाता - त्यातल्या शेवटच्या परिणामा च्या दिशेने फक्त वाटचाल करते ! 

Overall Rating : 7

----------------------------------------------------------------------------------

Thursday 25 August 2011

24th August - Sinhagad Architecture , Rajarshi Shahu , AISSMS

1) Sinhagad Architecture - Tuzse Naraj Nahi Jindagi

    Subject : Communal Violence in Uganda

    Story : Sam and Peter are childhood friends. Sam belongs to Tutsi Community and Peter belongs to Hutu Community in Uganda. Hutus are in Majority while Tutsis are in Minority. One day Sam and Peter meet in a bar. They are troubled by a stranger who belongs to Tutsi community and whose wife had been killed by Hutu men during the riots. The stranger asks Sam to leave Peter because Hutus have devastated their lives in their country. But being so close both refuse to do that. After this small incident both talk about their past. Sam tells Peter how his family was killed during the violence. He blames Hutus for that and becomes angry on Peter. Peter tells him his part of the story. He tells him how many of the Hutus were compulsorily brought into the violence. He tells Sam how his wife ( who belongs to Tutsi community ) was kept hostage and how he was forced to kill a Tutsi man. Coincidentally this man who gets killed by Peter happens to be Sam's father. The audience can see the whole emotional turmoil of these two characters on the stage. We can see that - both have been victims of the brutal - horrendous massacre in Uganda. Finally Sam offers Peter a drink and they both hug each other.

    Script : This was Sinhagad Architecture's first ever attempt at Purushottam. The writer did a good job with her pen. I talked to her - and asked her how she thought of performing this particular story on the stage. She told me that they have a student from Uganda in their class from whom she heard all this. Kudos to all of the students who thought to perform this play based on the real story. Congratulations !
               A little advise - she could have avoided the predictability of the story with very minor changes in it. That could have created bigger impact in receiving the play for the first time.

    Direction : Decent. Genuine ! Having story telling in left hand section and its actual happening or execution in right hand section was a good decision. But sometimes - they could have switched off all the lights in left hand section so that only sounds would reach from left and actual execution would continue on right. The use of stack of human dead bodies was excellent - it served the purpose.

    Drapery - Excellent. Well thought. The dresses, hair style , the skin color suited the characters. Good to see that in spite of being first timers - they have thought so much.

    Acting : Loud - Average. Could be improved a lot. The gestures of the characters were very loud and artificial.

    Music : Good. Decent.

    Lights : Could be improved a lot.

    Set changes - Need to be improved a lot.

    Overall Rating : 6 - 6.5

--------------------------------------------------------------------------------------------------------------

2) Rajarshi Shahu Mahavidyalay -  Andharache Bet

    Subject - The brooding of experimental theatre artists. The play dealt with the meaning of existence of the experimental theatre artists and their lost lives.

    Story : Rakhya is ( supposed to be a ) a very good actor in experimental theatre. His play Vartulacha Madhya Mi - is a huge success. But the play has one bold scene in it - because of which his parents are very much angry. His father slaps him in front of many theatre lovers on his opening performance. This hurts Rakhya a lot. Rather than leaving the experimental theatre, he chooses to leave his family and goes to an island ( symbolically - the unclear - dark region called Experimental theatre. ) He is guided there by an old fellow who used to be like Rakhya - and who has suffered a lot like Rakhya in his past life. This is the middle story of the play. The play begins with a new chap entering this 'Bet' where he wants to identify his real passion - whether he belongs to a cult of Experimental theatre or the professional theatre - or Houshi Rangabhumi. He is ( once again so called - very bright engineering student who leaves everything after his third year -and he is topper in his engineering career till third year ) an engineering student. When he enters this Bet - he gets very frightened with Rakhys's appearance but later gets used to it. Meanwhile a girl ( form the same experimental theatre group ) gives him a lecture ( actually a monologue ) on what the experimental theatre actually is. Then again Rakhy's story continues with his very loud acting. Finally because of problems with Rakhya - his director replaces him in Vartulacha Madhya Mi - and gives this new chap his role. The play ends with - an announcement from his mouth.

    Script : Very vague. The story takes unnecessary turns and jerks.

    Direction : Again according to me - it was very vague.

    Acting : Above average.

    Music : Good. Use of sounds was good.

    Set : Good. Use of levels - pandharya odhanya - looked good. It contributed to enhance the height logic of the stage.

     मला ह्या नाटकातली सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे - आपल्या स्वतःच्या नाटक मांडण्याच्या अभिव्यक्तीमधील अनवट मार्गांचा घेतलेला शोध. प्रायोगिक रंगभूमीवरील कलाकारांची व्यथा मांडण्यासाठी ज्या प्रतिमांचा वापर केला होता - तो परिणामकारक होता. पण ह्या अनवट मार्गांच्या प्रवासात एकसंधता नसल्याने त्याचा अपेक्षित परिणाम साधता आला नाही.  नाटकाच्या निर्मिती प्रक्रियेत दृश्य परिणामांचा विचार केलेला जाणवत होता - परंतु पात्रनिर्मीती आणि कथासुत्राच्या मांडणी मधल्या प्रवासाशी त्या एकरूप होत नसल्याने - पात्रांच्या भाव-भावनांशी , त्यांच्या सुख दुख्खांशी प्रेक्षक जोडला जात नव्हता. 

    Overall Rating : 5.5 - 6.0

--------------------------------------------------------------------------------------------------------------

3) AISSMS  - Anamik

मला ह्या नाटकातले पात्राचे द्वंद्व नक्की काय होते हेच कळले नाहीये. त्यामुळे ह्या नाटकावर कोणतेही भाष्य करण्यास मी असमर्थ आहे. मी नाटकाच्या लेखकाला विनंती करतो की त्याने स्वतःच्या नाटकावर प्रकाश टाकावा. 


धन्यवाद ! 


------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------





Tuesday 23 August 2011

23 August - Modern Arts Science and Commerce College , Garware Commerce College , Bhimrao Sawant Engineering College

1) Modern Arts Science and Commerce College - BOYS 

    Subject - Please help me finding out the subject of the play ! ! !

    Story :  Please help me finding out the story of the play too ! ! !

    Acting : Good , Decent.

    Direction : No potential in the script for direction.

    Music : Good.

    Set : I did not understand the significance of having Nazi's symbol on the left hand side wall. Overall - didn't find any meaning out of this particular set.

    Lights : Decent.

    उत्तम कलाकारांच्या संचाला बरोबर घेऊन अत्यंत उथळ  वरवरचे नाटक केले. नाटकातून आपल्याला नक्की काय मांडायचे आहे - किंवा अगदी दर वेळी काही मांडायचे जरी नसले तरी कसला अनुभव तरी द्यायचा आहे का - ह्याचा आधी विचार करणे गरजेचे आहे. विनोदनिर्मिती सहज आणि चांगली असली तरी - मुळात नाटक कशाबाबत करायचे आहे तो भाग नाटकाच्या शेवटी ५ मिनिटे आला तर त्या विनोदनिर्मितीला संपूर्ण नाटकाच्या दृष्टीक्ष्येपात काहीही अर्थ उरत नाही. इतक्या चांगल्या कलाकारांना घेऊन एखादे अप्रतिम नाटक बसवावेसे का वाटले नाही - हा मला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. 


असो ! 

    Overall Rating : 4.0 - 4.5 

--------------------------------------------------------------------------------------------------------------

2) Garware Commerce  : Ek hota Kasaw 

    Writer and Director - Akshay Joshi

    Story एका माणसाचे नुकतेच लग्न झाले आहे. लग्नानंतर त्याच्या वडिलांचा मृत्यू होतो. लग्नाच्या आधी त्याने व त्याच्या वडिलांनी दोघांनी मिळून घर विकत घेतलेले असते. वडिलांच्या मृत्युनंतर आता त्याला हे घर पूर्णपणे त्याच्या आणि त्याच्या बायकोच्या नावावर करून घ्यायचे आहे. त्यासाठी ह्या दोघांच्या लग्नाचा दाखला त्याला हवा असतो. तो त्याला काही केल्या मिळत नसतो. त्याला आपला लग्नाचा दाखला साग्रसंगीत मिळतो आहे अशी स्वप्नेही पडत असतात. ह्याच एका स्वप्नाने नाटकाची सुरुवात होते. थोड्या वेळाने नाटकात एक वेगळेच वळण येते. एकदमच कुठून तरी यम आणि त्याचा दूत येतो. ते चुकून ह्या माणसाला म्हणजे अमर ला उचलून नेतात. मग तो वरती जातो जिथे तो एक खटला लढवतो ज्यात तो सिद्ध करतो कि त्याला चुकून मारण्यात आले आहे आणि ह्याचे एकमेव कारण सिस्टीम मध्ये असलेले दोष आहेत. शेवटी अमर थोडा बौद्धिक पाजतो आणि नाटक संपते. 

    Acting अभिनयास फारसा स्कोप नव्हता. जो केला तो ठीक केला. सगळ्या मुलींनी चांगले काम केले. अक्षय नेही चांगले काम केले. पुन्हा एकदा असा फील आला - कि सगळे कलाकार उत्तम होते पण तरीही चांगले नाटक सादर करण्यात मात्र भरघोस अपयश आले.

    Direction : Above average.

    Set : Above average. स्टेजवर हातांनी फिरू शकणारे घड्याळ निर्माण केले होते. पण त्याची काही फारशी गरज होती असे काही वाटले नाही. 

    Music : Decent. Quality use of diegetic and non-diegetic sounds.

    Lights  : Decent.

   Overall Rating : 5 - 5.5 


----------------------------------------------------------------------------------


3)  Bhimrao Sawant Engineering - 'Parigh'



विषय - तारुण्यात सेक्स बद्दल मुलींना वाटणारे आकर्षण - त्यातून येणारे जबाबदार आणि बेजबाबदार वर्तन. कथा अशी काही नव्हती - चर्चानाट्य होते असे म्हणायला हरकत नाही.  

लेखन - ह्या मुलींचे ह्या स्पर्धेतले माझ्या मते हे पहिलेच वर्ष होते. नाटकाचे लेखन ( हा निकष धरल्यास ) - मोठ्या मनाने माफ करता येण्याइतपत ठीक-ठाक होते असे म्हणायला हरकत नाही. 

दिग्दर्शन - लेखनाबाबत माझे जे मत आहे तेच दिग्दर्शनाबाबत सुद्धा आहे. 

अभिनय - बरा - चांगले मार्गदर्शन मिळाले तर ह्याच मुली एखादे सुंदर नाटक सादर करू शकतात.  

वरकरणी पाहता नाटक हास्यास्पद होते. पण हा विषय मात्र दुर्लक्ष करता येण्याजोगा नक्कीच नाही. नाटकातला प्रमुख पात्राच्या मनात सतत चालू राहणारा CONFLICT अत्यंत खरा होता. प्रेम कशाला म्हणावं - आकर्षण कशाला म्हणावं - आकर्षणातून उत्पन्न होणारी सेक्स ची इच्छा - ती पुरी न झाल्याने मनात होणारी घालमेल - मग ती पूर्ण करण्यासाठी सर्वांच्या अपरोक्ष त्याची होणारी पूर्तता - हे सर्व करताना आपण चुकलो तर नाही ना अशी मनात सतत वाटत राहणारी सल - या बरोबरीने एकंदरीतच संस्कार - value system - ह्या गोष्टींबाबत मनात उठणारे असंख्य प्रश्न - ह्या सर्व गोष्टी प्रत्येक तरुण मुलाच्या आणि मुलीच्या बाबतीत या ना त्या मार्गाने घडतंच असतात. ह्यात हसण्यासारखे किंवा जो संघ हे विचार - त्यांचे द्वंद्व मांडू इच्छितोय त्यांना हिणवण्यासारखे काही नाही. मुलींचा प्रयत्न मला तरी अत्यंत सच्चा वाटला. 

पुण्यातल्या कित्येक महाविद्यालयांना नाटक सादर करण्याची उत्तम पार्श्वभूमी आहे. त्यांच्या पाहण्यात कित्येक चांगली नाटके येतात - ते चांगले नाटक करणाऱ्यांच्या सान्निध्यात असतात - पण तरीही त्यापैकी बर्याच महाविद्यालयांनी अत्यंत बालिश - पोकळ नाटके ह्या वर्षी सादर केली आहेत. हा सर्व विचार केला तर - आज तिसऱ्या नाटकातल्या सर्वच मुलींनी एक उत्तम नाटक सादर केले - हेच म्हणता येईल - किमान आपल्याला नक्की कशासंबंधी नाटकातून बोलायचे आहे - ह्याबद्दल त्या निश्शंक होत्या ! त्याबद्दल त्यांचे कौतुक ! 



Overall Rating : 4.5 - 5.0

Monday 22 August 2011

22 August - MMCC, Pune Jilha Shikshan Mandal, Sinhagad Academy - Kondhwa

1) MMCC - Logging Out 


Writer -  Dharmakirti Sumant

Subject - Internet addiction , subsequent loneliness and final coming out of this phase.

I don't know why MMCC did not perform any new play in this Purushottam. MMCC has performed this one, in Yashwantrao Mahakarandak Spardha - 2010. I guess BMCC had also performed it in PuLa Deshpande Mahakarandak and Sakal Mahakarandak Spardha. I guess that time Nipun Dharmadhikari had directed it.

Story : It's a story of a girl who hates her surroundings and who is addicted to the internet. She hates her neighbor, her CA class co-students and many others. She is also - a so called individualistic person. She always chats with her friend online, who wants to meet her in real - but she feels that - his online presence must be far more acceptable than his real presence. Some time later in the play she finds an online software called - Eliasa - who is an interactive program with whom you can share all your emotions and thoughts and problems and blah blah blah .... Eventually she becomes so addicted to this software that she cuts every contact with the outer world. Finally she comes out of this addiction and isolation/loneliness.

Acting : The girl's character was monotonous - not her fault - but that's a fault in the script. She did a decent job. The boy too did a decent job. The boy's friend's insertion didn't have any motive and it wasn't keeping the pace of the script. I felt that - he was there just to create some comedy in the play.

Direction : Good -  but the script hadn't too much potential in it.

Script :   लेखन खूपच चर्चिल वाटले. सुरुवातीचे मुलगा व मुलगी यांचे संवाद यांना कोणताही मोटिव्ह नव्हता असे मला तरी वाटले. एकुणात - साधारण . 


Set : Good. Use of painting on the wall - that was good. 
Music : Decent. 
Lights : Decent job. 


Overall Rating : 6.5 - 7.0 


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


2. Pune Jilha Shikshan Mandal - '1959 salcha picture'


Story : It's a simple and sweet story of a boy coming from England. He has taken the Law education. He falls in love with a village girl. She is a bharatnatyam dancer. Eventually he gets married to her. 


Acting : Above average. 


Direction : Above average. 


Script : Above average. The end was sweet. 


Set : Good 


Music : Use of ( I guess self composed  (correct me if i am wrong ) ) songs. Overall enjoyable. 


Lights : Above average. 


Overall Rating : 5 - 5.5


----------------------------------------------------------------------------------


3. Sinhagad Academy, Kondhwa - 'Dumla'


Original Story : Aaiina  


I have seen theatre group Jagar's - play named - Aaiina - based on the same story. Sinhagad Academy  did a wonderful job with the performance. Today's best performance indeed. 


Story : It's a story of a tribal family. The father in the family gets a  mirror from Jamindar. It's assumed that the tribal people so far don't know about mirror. When the father sees into mirror - he feels that he is seeing his father in it. But he doesn't want to share this secret with other family members and hence he keeps on talking to a mirror in their absence. But somehow other family members watch him talking to something. His daughter wants to investigate this. Hence she takes his mirror and sees herself in the mirror thinking that her father was talking to a girl of her age and he is in love with her. After sometime - her brother sees her talking to something and hence when he sees into the mirror he thinks that - his sister was talking to the good looking hunter. He asks the hunter to promise him a good job in the Paragana ( city like place ). Finally when the father's wife sees herself in the mirror she thinks that she is talking to her husband's new love. She calls her a bitch. The confusion continues till everybody decides that the father is going to return this gift to Jamindar. But father doesn't return it and keeps the mirror with him as a secret. He continues talking to his father at the end. 


A very nice story with inbuilt drama in it. A well executed performance too. 


Script : Good use of tribal tone and language in the script. 


Acting : All four characters did a great job. The girl was little bit loud. But all others were good. Though the tribal language is difficult to comprehend - sometimes the actors lost their clarity in the dialogues.


Direction : Good. Can be improved a lot.


Music : Sounds of tribal environment were used. The father humming some tune was good. Overall good. Sometimes the background music and sounds were so loud that I couldn't hear the dialogues clearly.


Set : Complementary. 


Lights : Very good. :-) 


मूळ कथासुत्रच खूप सुंदर होते. मानवी मनांच्या असलेल्या सूप्त इच्छा आकांक्षा मधले नाट्य सुंदर होते. प्रत्येक जण स्वताचेच प्रतिबिंब पाहत होता - पण खरं स्वतःच्या छाबिच्या आतील सूप्त मनोराथांशी खरं तर तो बोलत होता. त्यामुळे नाटकात रंगत आली. मानवी मनोव्यापार कलाकारांनीही सुंदरपणे टिपले. 

मी जागर संस्थेने जो प्रयोग केला होता तो बघितला होता - त्यात शेवट असा केला होता - सर्वांच्या भांडणात आरसा फुटतो. आणि त्याचे तुकडे होतात. शेवटी प्रत्येकाच्या हातात एक तुकडा असतो - ज्यात प्रत्येक जण आपल्या मनोरथांशी संवाद करताना दाखवला होता. हा शेवट मला जास्त अर्थपूर्ण वाटतो. 

कथेच्या रूपकाच्या अर्थाचा अजून जास्त विचार केल्यास प्रयोग अजून अर्थपूर्ण होईल यात शंकाच नाही. 

Overall Rating : 7.5

----------------------------------------------------------------------------------

Sunday 21 August 2011

21 August - VIT , Modern COE - Jedhe Mahavidyalay

1) VIT - Uttrardha

कथा :  हे नाटक शब्दशः गाभ्रीचा पाऊस ह्या सिनेमा चा उत्तरार्ध होते. नाटकातले म्युसिक सुद्धा ह्याचा सिनेमा मधले वापरले होते. पण असे म्हणताना मी नाटकाची संकल्पना ढापली ह्या अर्थी म्हणत नाहीये - खरच कौतुकाने म्हणतोय. विदर्भातल्या एका गावात एका शेतकऱ्याचा मृत्यू होतो. त्याने आत्महत्या केली कि खरच त्याचा मृत्यू म्हणजे एक अपघात होता हे कुणालाच ठाऊक नसते. पण त्याच्या मृत्युनंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळणार असते. ह्याच केस च्या तपासासाठी गावात तहसीलदार येतो व तो तपास सुरु करतो. आता तपासात राजकारण सुद्धा येते. गावाच्या पाटलाला शेतकऱ्याची आत्महत्या त्याच्या निवडणुकीसाठी बाधक ठरणार असते. त्यामुळे तो तहसीलदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतो व त्याला रिपोर्ट मध्ये - नैसर्गिक मृत्यू अथवा अपघाती मृत्यू अशी नोंद करायला सांगतो. तहसीलदार सद्वर्तनी असतो. तो त्याचे म्हणणे ऐकत नाही. पण तहसीलदाराला सुद्धा शेतकऱ्याच्या मित्रांशी बोलल्यावर त्याने आत्महत्या केली असेल असे मुळीच वाटत नसते. अनेक वेळा खोलात केलेल्या तपासानंतर त्याच्या लक्ष्यात येते कि हा मृत्यू अपघाती असण्याचीच शक्यता जास्त आहे. पण शेवटी - शेतकऱ्याच्या घराची परिस्थिती बघता - तो स्वतःशी विचार करतो - " कधी कधी काय बरोबर आहे यापेक्षा कशाने बरं होईल ते पाहावं. " अंतिमतः तो 'शेतकऱ्याने आत्महत्याच केली' अशी नोंद करण्याचा निर्णय घेतो. 
व्ही आय टी - कधीही न विचार करता काही करत नाही - ह्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला ! त्यांच्या एकांकीकेकडे सर्वांचे लक्ष असते - हे त्यामुळेच. 
लेखन - पूरक. 
दिग्दर्शन : अजून खूप चांगले होऊ शकले असते. काही प्रमाणत विस्कळीत पणा जाणवत होता. काच नसलेला / बंद असलेला कंदील खुंटीला अडकवणे - सुंदर होते. 
अभिनय : मुलीने छान अभिनय केला. गावातला पाटील - अत्यंत कमी वयात म्हणजे १७ व्या वर्षी पाटील झालाय कि काय बुवा इतपत बालिश वाटत होता. तहसीलदार सुद्धा तसाच काहीसा जाणवत होता. पण मुलीने अतिशय संयत अभिनय केला. पण तिच्या वेशभूषेमध्ये ती आत्यंतिक गरीब शेतकरी कुटुंबातली आहे असे मात्र वाटत नव्हते. बाकीच्याचा अभिनय पूरक होता असे म्हणता येईल. नाटकातील एक पात्र - गाभ्रीच्या मधील त्या काहीही न करता शेतावर झोपणाऱ्या माणसाचे जसेच्या तसे उचलले होते - त्याने काम चांगले केले. 
संगीत : गाभ्रीचा पाऊस ह्या सिनेमा मधले पार्श्वसंगीत वापरले होते. घड्याळाचा वापर छान केला. आय एल एस महाविद्यालयाने गेल्या वर्षी पार्श्वसंगीतासाठी वापरलेला एक उत्तम आवाज लोकांच्या मनात घर करून राहिला आहे. :-) 
नेपथ्य - अत्यंत कमी पण परिणामकारक. कमी नेपथ्याचा अडसर वाटला नाही. 
प्रकाशयोजना - छान. 
नाटकातले नाट्य सुरु होता होता ते संपते हा नाटकाचा दोष मला तरी वाटतो. बर एकंदरीत नाटक असे करून ठेवले आहे - कि आता ह्यात अजून काय करणार बुवा असा प्रश्न मला तरी पडला. जे काही केले आहे ते योग्य केले होते - पण तरीही नाटकाचा म्हणावा तेव्हढा परिणाम साधला गेला नाही. माझ्या मते - conflict resolution - फारच पटकन झाले - त्यासाठी खूप tensions निर्माण करावी लागली नाहीत - हे त्याचे कारण असावे. शिवाय नाटकात - नाटकाचा विषय मांडण्यासाठी मुख्य वाटे बरोबर इतर समांतर वाटांचा विचार फारच कमी झाला अथवा झालाच नाही. नाटकातले शेतकऱ्याच्या बायकोचे पात्र नीट विचार करून डिझाईन केले नव्हते असे वाटले. त्या पत्राला खूप जास्त सटल करण्याच्या नादात - ते पात्र खूप अशक्त राहिले असे वाटले. पण शेतकऱ्याच्या बायकोवर पाटलाचा डोळा असणे - ह्या पर्यायाकडे मुलांचे लक्ष गेले नाही - ह्याचे कौतुकच आहे. 

 Overall Rating : 6.5 - 7.0

----------------------------------------------------------------------------------

2) Modern College of Engineering - Event Incorporated

Characters : Dadasaheb / tatyasaheb / Gattamvar and others.

Story : Dadasaheb loses the battle of land aquisition against Tatyasaheb. He becomes very angry about this defeat. His so called right hand - Gattamvar - suggests him to have his protest through Uposhan. Gattamvar manages to bring a city based event management consultant to the village to manage all these Uposhan activities. A city based news channel reporter comes to village to cover this event. At end - Tatyasaheb - dadasaheb's rival also uses the same technique of Uposhan to dominate Dadasaheb.

शेवटी फक्त स्वार्थ उरतो. गावाचा विकास वगैरे गौण होऊन बसतं. 
Script : Average.
Direction : Average.
Music : Good.
Set : Average.
Lights : Average.
Acting : Loud. The girl did a decent job - but she was also very loud sometimes. Gattamvar did some comedy. Overall - average to above average.

Overall Rating : 5.5 - 6.0

----------------------------------------------------------------------------------

3) टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय - Chaparak

लेखन - शब्दबंबाळ
दिग्दर्शन - सुमार 
अभिनय : साधारण. 
नेपथ्य - ठीक-ठाक
प्रकाशयोजना - सुमार. 
संगीत  - सुमार. 
 
सध्याची बोकाळलेली व्यवस्था हा विषय. नाटकाला जाणकाराच्या मार्गदर्शनाची गरज ठळकपणे भासत होती. 
 
Overall Rating : 2.5 - 3.0

21 August Morning session - IMCC, Ramkrushna More College, Sadnyapan Vibhag - Pune University

1) IMCC - PL ki SRK 


    Subject - Sociopolitical , cultural , economical conflict ( ???? ) between Marathi people and North Indians.

    Writer : Yogesh Shejwalkar  

    Story : There was no story as such. There were only dialogues between the two characters - PL ( Marathi ) and SRK ( from Zansi ). Please help me out in writing a story of this play.

    Direction : Above average.

    Script : Spicy.

    Set : Good. Half of the part belonged to SRK and half to PL. Posters of Shivaji Maharaj and Aishwarya Rai were put on the wall to highlight the characters ( again ????? ).

    Music : Tracks from Christopher Nolan's films were used to develop tensions sometimes. Arambha hai prachand - bole mastakonke zund from the film Gulaal was used at the end. Overall music was good - it served the purpose. Everything was background music. Sounds were not used creatively.

    Lights : Light operation was really good. I wasn't able to find the reason for red spot for the window through which PL peeps into ladies hostel. Or was that Amber spot ? It unnecessarily created very suspicious motives. Overall Good.

   Acting : PL was doing a nice job. SRK was good too - but PL was better. His voice level - clarity - diction was good. Ms. Zunzunwala also did decent job. Overall decent performance in acting.

नाटकातला genuine conflict नक्की काय होता हेच काळात नव्हता. पात्रांच्या व्यक्तिरेखा - निर्माण करण्यात खोलात विचार केला आहे असा जाणवत नव्हतं. नाटक दोन समुदायांच्या मानसिकतेच्या पातळीवर रंगवण्याचा प्रयत्न केला गेला - आणि माझ्या मते तिथेच त्यातला जातिवंतपणा हरवून गेला. चुरचुरीत संवादांची पेरणी होती - पण मुळात विषय, कथासूत्र आणि व्यक्तिरेखा यांच्यातच फारशी खोली नसल्याने नाटक उथळ राहिले. त्यामुळे मानवी भाव-भावनांच्या अस्पर्शित कंगोर्यांकडे लेखकाने बघायचा प्रयत्न केलाय असे मुळीच वाटले नाही. १० मिनिटांनंतर नाटक - प्रेक्षक स्वस्थपणे डोळे मिटून ऐकू शकतो. दृक माध्यमात फक्त चांगली प्रकाशयोजना एवढेच लक्षात राहते.( योगेश च्या आयडेनटीटी नाटकाची आठवण या एकांकिकेतून होते. ) पात्रांच्या एकमेकांबरोबराच्या वागण्या बोलण्याला कोणताही मोटिव्ह नव्हता - लेखकाला खुसखुशीत संवाद घडवून आणायचे आहेत - म्हणून हा सीन घडतोय एवढाच तो काय मोटिव्ह उरला होता. 

एकंदरीत कलाकारांच्या स्वाभाविक आणि नैसर्गिक अभिनयामुळे प्रयोग चकमकीत झाला असे म्हणता येईल. 


    Overall Rating : 6.5 - 7.0 


----------------------------------------------------------------------------------


2) Ramkrushna More Mahavidyalay - Navas 


   एक हलकी फुलकी गोष्ट होती. सोन्या हा साधा-भोला तरुण असतो. त्याचे नुकतेच लग्न झालेले असते. पण त्याच्या आईने नवस बोललेला असतो कि सुगीच्या दिवसांमध्ये पीक आल्यावर त्यातलं पसा-पसा धान्य प्रत्येक ज्योतीर्लीन्गाला अर्पण केल्याशिवाय सोन्या त्याच्या बायाकोशेजारी झोपू शकत नाही. सोन्याची यामुळे मोठी गोची होते. त्याचा मित्र सुबराव आणि आणखीन एक मित्र - सोन्याला यातून बाहेर काढण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवतात. पण आई पुढे कुणाचेच काही चालत नाही . शेवटी त्याची नवीन नवरीच - दिवस गेल्याचा बहाणा करते , आई नाखूष होऊन देवदर्शनासाठी बाहेरगावी जाण्याची तयारी करते.  सोन्या शेवटी आई च्या त्रासिक नवसातून सुटतो.


संगीत : जुन्या हिंदी गाण्यांचा सुंदर वापर केला होता. एकंदरीत छान.


प्रकाशयोजना - पूरक. 

लेखन - सहज - प्रवाही - कथा सतत पुढे नेणारं. 

दिग्दर्शन - कथेस पूरक व साजेसं. 

अभिनय - काही ठिकाणी लाउड वाटला. पण एकंदरीत चांगला. 

नेपथ्य - नेटकं. 

Overall Rating : 6 - 6.5 

----------------------------------------------------------------------------------


3) Sadnyapan Vibhag - गोडाऊन 
 
    Treatment and form - Absurd - Experimental. 
    Story : Two men are trapped in a गोडाऊन. One of them wants to go out of it. The other one seems quite comfortable being trapped. There is a third man - dead / unconscious on the ground. They start talking to each other. They dominate each other. They talk about their person experiences and sorrows. One of them hates poetry and poets. His father was a poet and from the childhood he had developed an inclination towards becoming butcher. The other one talks about his wife's death. The couple used to live together very happily - but one fine day she just quits her life and commits suicide. Each one blames the other one for the third person's death. One of them asks other to hang him till death - but he is so afraid of death that he constantly runs away from it.

  Overall - a vague story - absurd one.

   Script : Good.

   Direction : Treatment was good.

   Set : Set was really nice. Use of scrap in गोडाऊन , exhaust fan , empty boxes etc. Set seemed carefully designed and well thought. 

   Acting : Sometimes very loud. Overall good.

   Music : Nice. Use of diegetic and non-diegetic sounds was done nicely.

   Lights : Nice.  


   माझ्या मते गोडाऊन हे एक रूपक म्हणून घेतलं होतं. मनात साठून राहिलेल्या अनेक अडगळीच्या गोष्टींचा साठा करण्याची जागा - असा मी तरी त्याचा अर्थ घेतलं. जमिनीवर पडलेला मेलेला माणूस हा स्वतःमधल्या मेलेल्या अस्तित्वाचं रूपक होतं. गोडाऊन चे बंद दार मनातला झालेला कोंडमारा दर्शवते असे मला वाटले. exhaust fan ( बंद ) मनात साठलेले हे सर्व बाहेर काढण्याचा एक मार्ग सुचवते. पण तो exhaust fan कायम बंद ठेवलेला असतो. नाटकाच्या सर्वात शेवटी दोघांपैकी एक माणूस - त्या अर्धमेल्या / कोमात गेलेल्या / अथवा मेलेल्या माणसाला कृत्रिम श्वास पुरवताना दाखवला आहे. आधीच्या आत्महत्येच्या प्रयत्नां नंतर - जगण्याची - जीवनाची झालेली जाणीव माणसाला पुन्हा जगण्यास शक्ती देते - असा काहीसा आभास शेवटच्या त्या कृतीतून होतो. आपण जिवंत असण्याची जाणीव माणसाला किती गरजेची असते याचा प्रत्यय येतो. शेवटी नाटकातली दोन पात्रे हि एकाच माणसातल्या दोन प्रवृत्ती असाव्यात - असे एक interpretation मनात येऊन जाते.


चांगल्या नाटकामध्ये आशयाच्या possibilities च्या निर्मितीला महत्व दिलेले असते. एक अधिक एक बरोबर दोन - इतकं सोप्पं करून सर्व सांगितलं तर ह्या possibilities ना जागाच उरत नाही. 'गोडाऊन' मध्ये मात्र असे होत नाही. There are lot of spaces in the play - available for interpretations - and that's really a good thing about this play. पण तरीही पात्रांच्या व्यक्तिरेखांमध्ये वरवरपणा जाणवतो. त्यांचा अभिनय सहज वाटत नाही. नाटकातला conflict खूपच vague होऊन बसतो. 

Overall Rating : 7 - 7.5 


----------------------------------------------------------------------------------