Saturday 20 August 2011

20 th August PVG College of Science, MIT , Kaweri College.

गेल्या चार दिवसांपेक्षा आजचा दिवस पुरुषोत्तम साठी नक्कीच उजळ ठरला. तीनही नाटके एका पातळीच्या वर झाली. थोडक्यात गेल्या चार दिवसांचे दाटलेले मळभ दूर झाल्यासारखे वाटले. 

1) PVG College of Science  -  7.5 on Richtor Scale

    Writer - Himanshu Vaze
    Characters - 3 friends ( say 1, 2 & 3 )

    Story : Three room mates are in a room. One of them is watching a TV. Suddenly he gets shocked to see something on TV. A sudden blackout is followed by this. The next scene opens with the two characters trapped under the broken construction because of earthquake - and hence the name. After this these two characters try very hard to get out of it - but they can't. In their ultimate effort the set changes and suddenly general lights come and they continue watching TV. This is the twist. What happened just now is not the actual earthquake but they imagine themselves in the situation.

    Script : I guess this play has won Jayram Hardikar Karandak many years back. Script is okay.

    Direction : Decent. Use of dust was good.

    Acting : Average. Diction was not clear. One could easily see their hard effort in acting.

    Set - Satisfactory - but could be much better.

    Lights : Good. Light operation was really nice.

    Music - Decent.

   
नाटक प्रायोगिक होते. दोघेही जण acting करताहेत हे जाणवत होतं. मधेच उगाचच अतिशय मोठ्याने ओरडत होते. जमिनीखाली २५ फूट वारा कसा काय झुळझुळत होतं आणि तोही गार वारा हे माझ्या तरी आकलनशक्तीच्या बाहेरचे आहे. lighter च्या उजेडात नाटकातला एक छोटा भाग केला तो छान झाला. संपूर्ण नाटक अत्यंत कमी उजेडात होऊ शकले असते - थीम ला ते साजेसे होते. भूकंपाच्या मलब्याखाली अडकलेले दोन जीव एवढीच ओळख पात्रांना होती - त्यांना स्वतःचे आयाम नव्हते.

स्वतःचं मरण स्पष्ट दिसत असताना माणूस कसा विचार करेल - किमान मरतानातरी तो खरा वागेल का - आपल्या सर्व पापपुण्याचा हिशोब करेल का - दुसरीकडे कुठेतरी नैसर्गिक आपत्ती आल्यास आपला त्याकडे बघायचा दृष्टीकोन कसा असतो - आणि स्वतःवर तोच प्रसंग ओढवला तर तो कसा बदलतो - या गोष्टींवर अजून खूप जास्त विचार व्हायला हवा होतं. तो झाला नाही. त्यामुळे नाटक फक्त भूकंप पुरतेच सीमित राहिले. मानवी भाव भावनांच्या मुळाशी ते पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे दोघांचं मरणासन्न होताना आयुष्याची नवीन जाणीव होणं - ह्या विचारापासून नाटक खूपच दूर राहिले. त्यामुळे २५ फूट खोलीत सगळं घडत असलं तरी नाटक मात्र जमिनीवरच रहात. शेवटी जेंव्हा प्रेक्षकांना असं कळत कि आपण जे नुकतंच बघितलं ते मुळात घडलंच नव्हतं - तेंव्हा साहजिकच प्रेक्षकही नाटकापासून दूर जातो.

एक suggestion : भूकंप रंगवण्यासाठी विंग, backdrop ह्या गोष्टी सुद्धा हलवल्या तर त्याचा फील अजून दुणावेल.

Overall Rating : 5.5

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 2) MIT - प्रश्नचिन्ह !

   Story : Somewhat like this - http://en.wikipedia.org/wiki/Exam_(film)

   Characters - total 8 - 6 people appearing for the exam - one invigilator etc.

   Direction : Good. Voice level low.

   Acting : Good.

   Lights : Nice.

   Music : Use of heart beats is relally nice. Overall - music was good and appropriate. Music
                operation was nice. Kudos. :-)

   Set : Decent.

  
नाटक कुठेही बोअर झालं नाही ही नाटकाची सर्वात जमेची बाजू. शेवटपर्यंत नाटक प्रेक्षकाला खिळवून ठेवतं. एवढं सोडल्यास नाटकातून बाकी काही मिळत नाही.

Overall Rating : 5.5 - 6.0

----------------------------------------------------------------------------------

3) Kaweri College - Gaavgundi 

सर्वप्रथम मनापासून अभिनंदन. आज एक अत्यंत सच्चा प्रयत्न पाहायला मिळाला. प्र्रयोग केवळ सच्चा होता असे नाही तर एकूणच प्रत्येक विभागात नाटक उत्तम झालं.

कथा : गावात प्रगतीचे - भरभराटीचे वारे वाहू लागले आहेत. भीमा ( नाव कदाचित चुकत असेल ) एका सभेस येतो. तिथे गावातल्या बदलांची चर्चा होत असते. गावातल्या बायका सोन्याने मढवल्या गेलेल्या दिसतात. गावात मोठ्ठी scheme होणार असते. त्यासाठी builder ला गावातली जमीन हवी असते. बिल्डर भीमा कडे जमिनीची मागणी करतो. भीमा नकार देतो. आणि इथून भीमाच्या छळाला सुरुवात होते. त्याचा शेताकडे जाण्याचा मार्ग रोखला जातो. उभे पीक करपून जाते. वहीवाटेच्या हक्कासाठी तो police station मध्ये जातो. तिथे त्याला जमिनीचा सातबाराचा उतारा आणायला पाठवले जाते. तहसीलदार कचेरीत - तो गावाचा रहिवासी असल्याचा दाखला आणण्यासाठी सरपंचांकडे पाठवले जाते. सरपंच कागदपत्रे देण्यास नकार देतो. इथे सगळ्याच बाजूने भीमाचे आक्रसले जाणे फारच परिणामकारकपणे दाखवले आहे. भीमाच्या बापाला जेंव्हा हे सगळे कळते - तेंव्हा तो हाय खाऊन मरतो. बापाला चिता देताना बिल्डर तिथेच कागदपत्रे घेऊन येतो - भीमाचा अंगठ्याचा ठसा घेतो - १० लाख रुपये रोख त्याला देऊन येतो. दलालही तिथून निघून जातो. आता फक्त भीमा एकटा उरतो. आत्यंतिक रागाने तो पैशाची bag रिकामी करतो आणि पैसे फेकून देतो. पण थोड्याच वेळात भानावर येऊन पुन्हा पैसे गोळा करून घरी जातो. इथे पुन्हा पैसे गोळा करताना भीमाची असहायता काहीही न बोलता प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. नाटकाचा शेवट पुन्हा पहिल्या opening scene पाशी होतो. बायका सोन्याने मढवलेल्या असतात. मुलांकडे mobiles असतात - laptops असतात. सर्वात शेवटी - भीमा स्वतः कला goggle घालून गुंडाच्या शुभ्र कपड्यांमध्ये stage वर येतो.

आपल्याला दर वेळी अन्यायाच्या निर्मितीमध्ये गुंडाचा हात दिसतो - पण एखाद्या गुंडाच्या निर्मितीमध्ये अन्यायाचा हात दाखवून नाटक सर्वांच्या मनात घर करून जातं !  

नेपथ्य - अत्यंत कमी पण अत्यंत परिणामकारक नेपथ्य. लेवेल्स चा सुंदर वापर.

संगीत - सुंदर.

प्रकाशयोजना - अप्रतिम . काही चुका झाल्या - पण नाटकाच सुंदर झाल्याने सर्वांनी माफ केल्या. :-)

लेखन - सुंदर . नेमके व परिणामकारक.

अभिनय - सर्वांचीच कामे सुंदर झाली. भीमाचे काम छानच झाले.

Overall Rating : 7.5 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------


  

5 comments:

  1. about pvg college of science:-
    25 foot khali gaar vaara nakkich yenar nai. pn tyala supporting ek dialouge hota:- 'vaara nai..after shock mule passage create zala asel...'

    ReplyDelete
  2. कावेरी कॉलेज... (गावगुंडी)
    केवळ ६ लेवल्स, ७-८ खुर्च्या आणि अगदी मोजकी साधनं घेऊन एका नवीन (म्हणजे अनुभवाने कमी म्हणून नवीन) मुलांच्या संचाने भयंकर परिणामकारक प्रयोग सादर केला. आणि ह्याच गोष्टीचा खूप मनापासून कौतुक वाटलं. विषय सुद्धा "आजचा" होता. भाषा सुद्धा साधी आणि सोप्पी उगाच कुठेही भाषालंकराचं अवडंबर नाही. खरोखरच सच्चा प्रयोग.
    फक्त एक सुचवावस वाटलं - भीमा च्या वडीलांचा (तात्या) आवाज नीटसा ऐकू येत नव्हता. आणि भीमा जेंव्हा भराभर बोलू लागतो तेंव्हा खूपच लक्ष देऊन ऐकावे लागतात शब्द. बाकी मला काहीच खटकलं नाही.

    संगीत आणि प्रकाशयोजना खूपच सुंदर आणि नाटक अगदी पूरक आणि साजेशी. एक चांगला अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद !! आणि अंतिम फेरीसाठी शुभेच्छा...

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. My name is Loukik Purohit, Though software engineer(blogging as JavaCurious) by profession I have a great interest drama,music, literature
    Read reviews about play by Kaveri college.
    My opinion slightly differ from above.The opinion is totally based on my experience and drama following and might be completely different from judges and other people.

    1)The story was predictable from the beginning.In the past there have been many plays/films based on this story-injustice to poor/farmer for the sake of his piece of land.I would had really appreciated if they would had done some thing new in execution(eg. 2-3 actors in different characters talathi, police etc.).

    2)The actor in a lead role gave a good performance.

    3)Reactions to the dialogs were weak(for that sake PVG COS were really good). There was lot of scope for implovement in acting for wife, son,agent talathi(remember talathi in"Jau tithe khau")

    4)Diction could be improved, also there were fumbles.

    5)Light was good, music created impact.Good use of levels.

    Overal, Lot of scope for improvement in acting, diction, direction.
    I personally would rate it 5.0

    ReplyDelete