Sunday 21 August 2011

21 August - VIT , Modern COE - Jedhe Mahavidyalay

1) VIT - Uttrardha

कथा :  हे नाटक शब्दशः गाभ्रीचा पाऊस ह्या सिनेमा चा उत्तरार्ध होते. नाटकातले म्युसिक सुद्धा ह्याचा सिनेमा मधले वापरले होते. पण असे म्हणताना मी नाटकाची संकल्पना ढापली ह्या अर्थी म्हणत नाहीये - खरच कौतुकाने म्हणतोय. विदर्भातल्या एका गावात एका शेतकऱ्याचा मृत्यू होतो. त्याने आत्महत्या केली कि खरच त्याचा मृत्यू म्हणजे एक अपघात होता हे कुणालाच ठाऊक नसते. पण त्याच्या मृत्युनंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळणार असते. ह्याच केस च्या तपासासाठी गावात तहसीलदार येतो व तो तपास सुरु करतो. आता तपासात राजकारण सुद्धा येते. गावाच्या पाटलाला शेतकऱ्याची आत्महत्या त्याच्या निवडणुकीसाठी बाधक ठरणार असते. त्यामुळे तो तहसीलदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतो व त्याला रिपोर्ट मध्ये - नैसर्गिक मृत्यू अथवा अपघाती मृत्यू अशी नोंद करायला सांगतो. तहसीलदार सद्वर्तनी असतो. तो त्याचे म्हणणे ऐकत नाही. पण तहसीलदाराला सुद्धा शेतकऱ्याच्या मित्रांशी बोलल्यावर त्याने आत्महत्या केली असेल असे मुळीच वाटत नसते. अनेक वेळा खोलात केलेल्या तपासानंतर त्याच्या लक्ष्यात येते कि हा मृत्यू अपघाती असण्याचीच शक्यता जास्त आहे. पण शेवटी - शेतकऱ्याच्या घराची परिस्थिती बघता - तो स्वतःशी विचार करतो - " कधी कधी काय बरोबर आहे यापेक्षा कशाने बरं होईल ते पाहावं. " अंतिमतः तो 'शेतकऱ्याने आत्महत्याच केली' अशी नोंद करण्याचा निर्णय घेतो. 
व्ही आय टी - कधीही न विचार करता काही करत नाही - ह्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला ! त्यांच्या एकांकीकेकडे सर्वांचे लक्ष असते - हे त्यामुळेच. 
लेखन - पूरक. 
दिग्दर्शन : अजून खूप चांगले होऊ शकले असते. काही प्रमाणत विस्कळीत पणा जाणवत होता. काच नसलेला / बंद असलेला कंदील खुंटीला अडकवणे - सुंदर होते. 
अभिनय : मुलीने छान अभिनय केला. गावातला पाटील - अत्यंत कमी वयात म्हणजे १७ व्या वर्षी पाटील झालाय कि काय बुवा इतपत बालिश वाटत होता. तहसीलदार सुद्धा तसाच काहीसा जाणवत होता. पण मुलीने अतिशय संयत अभिनय केला. पण तिच्या वेशभूषेमध्ये ती आत्यंतिक गरीब शेतकरी कुटुंबातली आहे असे मात्र वाटत नव्हते. बाकीच्याचा अभिनय पूरक होता असे म्हणता येईल. नाटकातील एक पात्र - गाभ्रीच्या मधील त्या काहीही न करता शेतावर झोपणाऱ्या माणसाचे जसेच्या तसे उचलले होते - त्याने काम चांगले केले. 
संगीत : गाभ्रीचा पाऊस ह्या सिनेमा मधले पार्श्वसंगीत वापरले होते. घड्याळाचा वापर छान केला. आय एल एस महाविद्यालयाने गेल्या वर्षी पार्श्वसंगीतासाठी वापरलेला एक उत्तम आवाज लोकांच्या मनात घर करून राहिला आहे. :-) 
नेपथ्य - अत्यंत कमी पण परिणामकारक. कमी नेपथ्याचा अडसर वाटला नाही. 
प्रकाशयोजना - छान. 
नाटकातले नाट्य सुरु होता होता ते संपते हा नाटकाचा दोष मला तरी वाटतो. बर एकंदरीत नाटक असे करून ठेवले आहे - कि आता ह्यात अजून काय करणार बुवा असा प्रश्न मला तरी पडला. जे काही केले आहे ते योग्य केले होते - पण तरीही नाटकाचा म्हणावा तेव्हढा परिणाम साधला गेला नाही. माझ्या मते - conflict resolution - फारच पटकन झाले - त्यासाठी खूप tensions निर्माण करावी लागली नाहीत - हे त्याचे कारण असावे. शिवाय नाटकात - नाटकाचा विषय मांडण्यासाठी मुख्य वाटे बरोबर इतर समांतर वाटांचा विचार फारच कमी झाला अथवा झालाच नाही. नाटकातले शेतकऱ्याच्या बायकोचे पात्र नीट विचार करून डिझाईन केले नव्हते असे वाटले. त्या पत्राला खूप जास्त सटल करण्याच्या नादात - ते पात्र खूप अशक्त राहिले असे वाटले. पण शेतकऱ्याच्या बायकोवर पाटलाचा डोळा असणे - ह्या पर्यायाकडे मुलांचे लक्ष गेले नाही - ह्याचे कौतुकच आहे. 

 Overall Rating : 6.5 - 7.0

----------------------------------------------------------------------------------

2) Modern College of Engineering - Event Incorporated

Characters : Dadasaheb / tatyasaheb / Gattamvar and others.

Story : Dadasaheb loses the battle of land aquisition against Tatyasaheb. He becomes very angry about this defeat. His so called right hand - Gattamvar - suggests him to have his protest through Uposhan. Gattamvar manages to bring a city based event management consultant to the village to manage all these Uposhan activities. A city based news channel reporter comes to village to cover this event. At end - Tatyasaheb - dadasaheb's rival also uses the same technique of Uposhan to dominate Dadasaheb.

शेवटी फक्त स्वार्थ उरतो. गावाचा विकास वगैरे गौण होऊन बसतं. 
Script : Average.
Direction : Average.
Music : Good.
Set : Average.
Lights : Average.
Acting : Loud. The girl did a decent job - but she was also very loud sometimes. Gattamvar did some comedy. Overall - average to above average.

Overall Rating : 5.5 - 6.0

----------------------------------------------------------------------------------

3) टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय - Chaparak

लेखन - शब्दबंबाळ
दिग्दर्शन - सुमार 
अभिनय : साधारण. 
नेपथ्य - ठीक-ठाक
प्रकाशयोजना - सुमार. 
संगीत  - सुमार. 
 
सध्याची बोकाळलेली व्यवस्था हा विषय. नाटकाला जाणकाराच्या मार्गदर्शनाची गरज ठळकपणे भासत होती. 
 
Overall Rating : 2.5 - 3.0

2 comments:

  1. VIT : Uttarardha

    नाटक खूपच संथ वाटलं... म्हणजे खरंतर पात्रं सशक्त नव्हती म्हणून असेल कदाचित... पण एकंदरीत (ताकद असून सुद्धा) परिणाम खूपच कमी साधला गेला... बाकी सगळे अभिनेते, अगदी दिग्दर्शकाच्या तालमीत तयार झालेले वाटत होते... नाटक वरवरचं नक्कीच नव्हतं (अभ्यासपूर्ण असावं कदाचित), पण योग्य तो परिणाम आणि एकंदरच असं सगळा जुळूनच नाही आलं, अगदी शेवटपर्यंत !!!
    खरंतर आता गम्मत अशी आहे की "शेतकऱ्यांची आत्महत्या" या विषयावर नाटक हे एक routine झालये. म्हणजे चघळून चघळून तो विषय आता जुनकट होईल का काय अशी भीती निर्माण झाली आहे... माझ्यासारख्या सामान्य (बुद्धीच्या) प्रेक्षकाला तर अरे किती वेळा तेच तेच दाखवणार आहात, नवीन बघू देत न काहीतरी. कंटाळा आला हो !! असा झालाये...
    असो...
    तर मुद्दा हा आहे की - परिस्थिती तर आता प्रत्येकाला माहिती आहे, त्यात आता काही (नवीन) दाखवण्यासारखं राहिलं आहे असा मला तरी वाटत नाही... फक्त "आजचा विषय" (आणि त्याचं मिळणारं so called advantage) म्हणून अशी नाटक होण्याची शक्यताच आता जास्त होत चालली आहे.

    ReplyDelete
  2. VIT -
    natak jara slw zale baki maze mat girish shi purnapane sahamat aahe..
    SET , LIGHTS & MUSIC cha purak wapar changla hota..

    MODERN COLLEGE -
    natakatil patrancha atyant khota wawar khhup spashta disat hota.
    ti chahachi tapari 1st scn la tithe aaste tithech natakatlya direction chya univa disayla laglya..
    to event manager khhup jast khota watala n ti mulagi purna natak fakt hatwaryanwar ch kartiy ki kay asa disat hota..
    overall tyanchya kadun apeksha hotya but nahi zalya kahich purna...

    ReplyDelete